आ. योगेश कदमांनी पेलले विकासकामांचे 'धनुष्य'; दापोलीत चालणार महायुतीचा 'बाण'
दापोली विधानसभेची निवडणूक यंदा चांगलीच रंगात आली आहे. महायुतीकडून विद्यमान आ. योगेश कदम यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दापोलीतील निवडणूक ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली असली तरी, आ. योगेश कदम यांच्या विकासाकामांमुळे ती शेवटच्या टप्प्यात एकतर्फी वाटत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ज्येष्ठ नेते रामदास कदमांची व्यूव्हरचना व आ. योगेश कदमांची कल्पकता या जोरावर ठाकरे गटाचे आमदार होण्याचे यंदाही दिवास्वप्न राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आ. कदमांनी सोडवला पाणीप्रश्न
खेड शहरातील नागरिकांची पाण्याची गरज ओळखून आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नातून तेथे 43 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. लवकरच खेडकरांची पाण्याची समस्या सुटणार आहे. याशिवाय दापोली तालुक्यातील खाडी व आडे उटंबर परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. परंतु तेथे गाळ साचत असल्याने मासेमारी करणाऱ्या बांधवांना त्रास सहन करावा लागत होता. आता हीच अडचण ओळखून येथील ब्रेक वाँटर वाँलसाठी 80 कोटींचा निधी आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नातून प्रस्तावित आहे. तसेच आडे उटंबर येथे 75 कोटींचा निधी प्रस्तावित आहे. याशिवाय दापोली तालुक्यातील आंजर्ला खाडी येथे मासेमारी करणाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी ग्रेयान्स येथे बंधारा बांधण्यासाठी 57 कोटींचा निधी आ. कदम यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला.

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी
लाटवण ते विसापूर रस्त्यासाठी 55 कोटी, विसापूर ते दापोली रस्त्यासाठी 141 कोटी आणि दापोली ते खेड रस्त्यासाठी 138 कोटींचा निधी आ. योगेश कदम यांनी आणला. महायुती सरकराच्या ड्रिम प्रोजेक्ट ठरलेल्या कोस्टल हायवेवर खाडी पूल व्हावे अशी दापोलीकरांची मागणी होती. त्यानंतर आ. कदम यांच्यामार्फेत पाठपुरावा सुरु होता. त्या मागणीला यश येऊन बाणकोट खाडी पुलाच्या कामासाठी 409 कोटी, केळशी खाडी पुलासाठी 148 कोटी रुपये शासनाने मंजूर केले. कळंबनी ते ग्रामीण रुग्णालय, हंबीरवाडी ते रेल्वे स्टेशन चोरद पुलाच्या बांधकामासाठी 4 कोटी 14 लाखांचा निधी आ. कदम यांनी मंजूर करुन आणला होता. विन्हे येथील तलावाच्या संवर्धनासाठी 53लाखांचा निधी मंजूर करुन आणला. दाभोळ धक्याच्या दुरुस्तीसाठी 4 कोटींचा निधी मंजूर करत आ. कदम यांनी मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन दिले.
सर्व समाजघटकांना दिला न्याय
दापोली येथे कुणबी भवन व्हावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासून कुणबी समाजाची मागणी होती. त्यानुसार एक कोटी रुपये किंमतीचा जागा आ. कदम यांच्या पाठपुराव्यानंतर समाजबांधवांना बक्षिसपात्र करुन देण्यात आली. तेथे लवकरच कुणबी भवन साकारणार आहे. याशिवाय खेड येथे आंबेडकर भवन व्हावे अशीही मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात होती. त्यानंतर आ. कदम यांनी या भवनासाठी 3.5 कोटींचा निधी मजूर करुन आणला. दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळाही आ. कदम यांच्या मार्गदर्शनातूनच उभारण्यात आला. याशिवाय दापोली तालुक्यातील गोवा व हार्णे येथील किल्ला संवर्धाासाठीही आ. कदम यांनी सुमारे सात कोटींचा निधी आणला होता.
शाश्वत पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन
जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी 2 कोटी 75 लाख रुपयांचा निधी आ. कदम यांनी मंजूर करुन आणला. हा गाळ काढल्याने दापोली व खेड येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. खेड तालुक्यातील आंबवली येथे लघू पाटबंधारे योजनेसाठी 44 कोटींचा निधी खर्चून आ. कदम यांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न मार्गी लावला. याशिवाय खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे लघू पाटबंधारे योजनेसाठी 73 कोटी रुपये मंजूर करुन आणत आ. कदम यांनी तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला. मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणाची गळती थांबविण्यासाठी आ. कदम यांनी 22 कोटींचा निधी मंजूर करुन आणला. ही गळती थांबल्याने परिसरातील विहिरी व कुपनलिकांची पाणपातळी वाढली. दापोली तालुक्यातील भडवळे येथील साठवण तलावासाठी आ. कदम यांनी 44 कोटींचा निधी आणला होता. या योजनेमुळे परिसरातील हजारो नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. दापोली तालुक्यातील जामगे येथे लघू पाटबंधारे योजना राबविण्यासाठी सुमारे 100 कोटींचा निधी आणला. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.
महिला व तरुणांना दिला रोजगार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी दापोली येथे महिला गट विक्री व प्रशिक्षण केंद्राचे बांधकामही सुरु आहे. मांडणगड येथे एक हजार एकर जागेत जम्बो एमआयडीसी मंजूर करुन आणण्याचे श्रेयही आ. कदम यांना जाते. खेड तालुक्यातील लोटे येथे कोकाकोला कंपनीचा कारखाना, स्क्वेअरपोर्ट शिपयार्ड आणि खेड येथे जिल्ह्याीतल पहिले शीतगृह तयार करण्याचे श्रेयही आ. कदम यांना जाते. यामुळे तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे.
दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास 21 कोटी रुपये निधी मंजूर करुन आ कदम यांनी हजारो रुग्णाना दिलासा दिला. कोरोना काळतही आ. कदम अँक्टीव्ह होते. सुमारे 50 लाख रुपये खर्चून ऑक्सीजन काँन्सन्टेटर व हजारो रुग्णाला रेमेडिसीव्हर, रुग्णवाहिका तसेच शिवतेज कोविड सेंटर सुरु करुन आ. कदम यांनी नागरिकांना दिलासा दिला होता.












Click it and Unblock the Notifications