महाराष्ट्रात चाललंय काय? जीव एवढा स्वस्त झालाय का..? आधी कुर्ल्यात आता यवतमाळात हिट अँड रन! 3 गंभीर
Yavatmal Hit and Run : कुर्ल्यात बेस्ट बसचालकाने धडक दिल्याने भीषण अपघातात 6 जण ठार तर 48 जण जखमी झाल्याची भीषण घटना समोर असतानाच आता यवतमाळमध्येही हिट अँड रनची घटना घडली. बेदरकारपणे वाहन चालवत मार्केटमध्ये दुचाकी, हातगाडीला उडवल्याने 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आर्णी रोडवर काल रात्री घडली.
पाच ते सहा लोक जखमी
यवतमाळमध्ये हिट अँड रनच्या भीषण घटनेने खळबळ माजली. काल रात्री एका भरधाव कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडवित बेदरकार वाहन चालविले. हा प्रसंग भयावह होता. यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून आर्णी रोडवर ही दुर्घटना घडली, ज्यात पाच ते सहा लोक जखमी झाले आहेत.

असा झाला अपघात
वडगाव मार्गे हे चारचाकी वाहन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले ज्यात ते पद पथावर भाजी विकणाऱ्या हातगाड्यांना टक्कर देत पुढे निघाले, या गाडीने चार ते पाच भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांना व तीन ते चार दुचाकीस्वारांना उडवत नेले. ही धडक इतकी भीषण होती की रस्त्यावर भाजीपाला, दुचाकी आणि जखमी माणसांना चिरडले. पुढे एका खांबाला ही कार धडकली.
कारचालक पोलिसांच्या ताब्यात
नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. कारच्या चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा कारचालक मद्यप्राशन करून असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
कुर्ल्यात काय घडला होता प्रकार?
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनेकजण चिरडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताला कारणीभूत संशयीत बेस्ट बसचालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.












Click it and Unblock the Notifications