Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

यवतमाळमध्ये पुन्हा रंगणार भाजपच्या मदन येरावार विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यात सामना

Yavatmal Assembly Elecrtion 2024 : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेले भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीने काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांना रिंगणात उतरविले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी मतदार कुणाला कौल देतात हे निकालानंतरच कळणार आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व केलेले आहे. जांबुवंतराव धोटे आणि मदन येरावार या दोघांनीही तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. लिंगायत, आर्यवैश्य, जैन, आणि मारवाडी समाजालाही या मतदारसंघात संधी मिळाली आहे. एकूण नऊ वेळा कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. मात्र, या भागात कुणबी, तेली, माळी, अनुसूचित जातींची मते अधिक असूनही अल्पसंख्य समाजाचा उमेदवार निवडून येण्याचा इतिहास आहे.

Yavatmal Assembly Elecrtion 2024 Madan Yerawar vs Balasaheb Mangulkar

मदन येरावार यांचा राजकीय प्रवास

मदन येरावार यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा निवडणुकीत उतरले, परंतु त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2004 मध्ये विजयी झाले, परंतु 2009 आणि 2013 च्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये त्यांनी 1,227 मतांच्या अल्प फरकाने विजय मिळविला, तर 2019 मध्ये देखील 2,253३ मतांनी विजय संपादन केला. आता सातव्यांदा निवडणुकीत उतरताना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बाळासाहेब मांगुळकर वचपा काढणार का?

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळमधून उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत मांगुळकर यांनी मदन येरावार यांच्याशी कडवी लढत दिली होती. त्यावेळी त्यांना 78,172 मते मिळाली होती, तर येरावार यांनी 80,425 मतांसह विजय मिळविला होता. यामुळे मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मांगुळकर यंदा पुन्हा तयारीत आहेत.

Take a Poll

वंचित बहुजन आघाडीचे वाघमारे सुद्धा मैदानात

वंचित बहुजन आघाडीने यावेळी डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत वंचितचे उमेदवार योगेश पारवेकर यांना 7,930 मते मिळाली होती. यावेळी वंचित कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागले आहे.

Yavatmal Assembly Elecrtion 2024 Madan Yerawar vs Balasaheb Mangulkar

जातीय समीकरणे आणि यंदाची निवडणूक

यवतमाळ मतदारसंघात विविध समाजातील मतदारांची संख्या लक्षात घेतली तर कुणबी, तेली, माळी, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्य समाजाचे मतदार निर्णायक ठरणार आहेत. अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व येथील निवडणुकांमध्ये कायम राहिले आहे. यंदा मदन येरावार आणि बाळासाहेब मांगुळकर यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे, तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मतविभाजनात कशी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2019 चा निसटता विजय

2019 च्या निवडणुकीत मदन येरावार यांना 80,425 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अनिल मंगुळकर यांना 78,172 मते मिळाली होती. वंचितचे योगेश पारवेकर यांना 7,930 मते मिळाली होती. त्यामुळे मतविभाजनामुळे येरावार यांचा विजय निसटता ठरला होता. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी, आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत. यवतमाळच्या सामाजिक आणि जातीय समीकरणाचा विचार करता, मतदार कोणाला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+