'त्या' दिवशी काय घडलं? काळी छत्री घेऊन यशश्री गेली, मागे दाऊद शेखही..उरणमधील 'ते' फुटेज आलं समोर
मुंबई : उरणमध्ये यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचे अवयव कापून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणात दाऊद शेख या संशयिताचे नाव पुढे आले आहे. त्याने यशश्रीवर अत्यंत निर्घूनपणे वार करुन तिला ठार केले. या घटनेनंतर अखेरच्या दिवशी काय घडलं यासंदर्भात एक फुटेजही समोर आले आहे.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना संपता संपत नसून आता नवी मुंबईतील एका तरुणीचा निर्घून खून केल्याची घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.

या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यातील एका फुटेजमध्ये यशश्री हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसते. तर संशयित आरोपी दाऊद शेख हाही तिच्या मागे जाताना दिसत असल्याचं समोर आलं आहे.
दाऊद द्यायचा यशश्रीला त्रास
संशयित आरोपी दाऊद शेख हा अनेक वर्षांपासून यशश्रीला त्रास देत होता अशी माहिती समोर आली असून यासंदर्भात तिच्या वडीलांनी तक्रारीत नमूदही केलं आहे. त्यानुसार, पोलिसांनी दाऊदचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दाऊद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
नवी मुंबईतील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी गोळा केले आहे. यातील एकात मुख्य आरोपी दाऊद शेख एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी तपास करत असताना पनवेल रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून हे फुटेज मिळाले आहे.
10 मिनिटांनंतर यशश्रीच्या मागे दाऊद गेला
सीसीटीव्हीत यशश्री शिंदे हातात छत्री घेऊन जाताना दिसते तर तिच्या मागे 10 मिनिटांनी दाऊद शेख जात असल्याचं दिसतं. हे 25 जुलैचे फुटेज आहे. यात दाऊद शेख यशश्रीनंतर 10 मिनिटांनी अर्थात 2 वाजून 22 मिनिटांनी तिच्या मागे जात आहे. विशेषतः याच दिवशी यशश्रीची हत्या करण्यात आली होती.
दाऊद फरार, पोलिसांकडून शोध
यशश्रीच्या खुनानंतर संशयित आरोपी दाऊद शेख पसार झालेला आहे. या प्रकरणात पोलिस त्याच्या कसून शोध घेत असून काही पथकेही त्याच्या मागावर आहेत. त्याचे सीडीआर, लोकेशनही काढले जात असून तांत्रिक तपासही केला जात आहे.
असा केला निर्घून खून
उरणमधील यशश्री शिंदेवर एकतर्फी प्रेम दाऊद करत होता असं सांगण्यात येत आहे. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications