Worli hit-and-run: वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचा मद्यप्राशन रिपोर्ट निगेटिव्ह

Worli hit-and-run: मुंबईतील वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य संशयित मिहीर शाहचा फॉरेन्सिक अहवाल जाहीर झाला आहे. त्याच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांची तपासणी केली असता अल्कोहोलचे कोणतेही अंश आढळले नाहीत. अट्रिया मॉलसमोर रविवारी 7 जुलै रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता.

या अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह नंतर विरार फाटा येथून अटक करण्यात आली होती. वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता. तसंच त्यानं मद्याचं सेवन केल्याचा आरोप होता. त्यानंतर मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल आज वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली .

Mihir Shah

हिट अँड रन प्रकरणात राजेश शहा हे जामिनावर आहेत. तर इतर दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. अपघाताच्या वेळेस मिहीरने मद्यप्राशन केल्याची तोंडी कबुली दिली होती. अपघातापूर्वी तो त्याच्या मित्रांसोबत जुहूच्या एका हॉटेलमध्ये गेला होता. त्याठिकाणी त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केले होते.

मरिनड्राईव्हला जाताना त्याने कार चालविताना मद्यप्राशन केल्याची कबुली दिली होती. हा कबुली जबाब व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याच्या रक्ताचे आणि लघवीचे नमूने घेण्यात आले होते. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+