मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी, धक्कादायक माहिती आली समोर
Death threat to Prime Minister Modi- मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेची ओळख पटविण्याचे व तिने काँल का केला, याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. मात्र या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांच्या नावाने दिली धमकी
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती दिली. या प्रकारानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा फोन आल्यानंतर मुंबई पोलिस तातडीने सतर्क झाले. मोदींना मारण्यासाठी शस्त्राची तयारी करत असल्याची माहिती या व्यक्तीने फोनवरुन दिल्याने पोलिसांनी तातडीने पावले ऊचलली.
काँल करणारी व्यक्ती आहे महिला
बुधवारी रात्री नऊ वाजता धमकी देणाऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांना जिवे मारण्याचा प्लॅन केल्याचे सांगितले. शिवाय यासाठी शस्त्रांची तयारी सुरु असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने पावले उचलत फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. काँल करणारी व्यक्ती ही महिला असल्याचा पोलिसांनी केला आणि त्यादृष्टीने तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी शितल चव्हाण नावाच्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
धमकी देणारी महिला मानसिक दिव्यांग
पोलिसांनी शितल चव्हाण या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात ही महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच समजतंय. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. या महिलेच वय 34 वर्ष असून पोलिसांनी अजून चौकशीसाठी प्रयत्न सुरु केले आहे.












Click it and Unblock the Notifications