दसरा मेळाव्यात राज-उद्धव ठाकरे एकत्र येतील का? युती होईल का; सभा कोण गाजवणार शिंदे की ठाकरे? वाचा
Will Raj Uddhav alliance come to Dussehra melava : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वारे वाहत असून आता महापालिका निवडणुकाही दिवाळीनंतर जानेवारीच्या आत होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच सर्वांच्या नजरा ठाकरे बंधुंच्या मिलनाकडे लागल्या आहेत, यासह दसरा मेळावाही २ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे आता या मेळाव्यानिमित्त तीन प्रश्न राजकारणात रस असलेल्यांना पडला आहे.

पहिला प्रश्न म्हणजे दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसतील का, ते एकत्र येणार आहेत का? दुसरा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धन ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे दसरा मेळाव्यात कुणाची पाॅवर दिसणार अर्थात उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांपैकी कोण वरचढ ठरणार अन् कुणाची सभा गाजणार हे.. 'या' 3 प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया.
१. दसरा मेळव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या अनेक दशकांपासून एकत्र दिसलेले नाहीत. आता तो योग आला असे म्हणता येईल कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू भावनिक आणि नात्याच्या पातळीवर एकत्र आले आहेत. त्यांच्यातील दुरावा दूर झाला आहे. विशेषतः राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण मिळाले आहे म्हणून हे दोघे शिवतीर्थावर दसरा मेळव्यात एकत्र दिसण्याची शक्यता दाट आहे.
२. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येऊ शकतात,मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी मनपा निवडणुकीआधी एकत्र येऊ शकतात. याआधी या दोन पक्षांनी मुंबईतील स्थानिक पातळीवरील निवडणूक नुकतीच एकत्र लढवली होती. त्यात दोघांचा पराभव झाला ही वेगळी बाब आहे पण संजय राऊत यांनी युतीचे आजही संकेत दिल आहेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी या दोन युती होऊ शकते.
३. ठाकरे कि शिंदे कोण सभा गाजवणार, कोण वरचढ ठरणार?
शिवसेना पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र वेगळ्या सभा २०२२ पासून होतात. शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची सभा होते तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा आतापर्यंत झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला वारसा आहे आणि त्यांची सभा नेहमीच गाजते. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळालेली आहे, विशेषतः यंदा राज ठाकरे जर या सभेला उपस्थित राहीले तर साहाजिकच उद्धव ठाकरेंच्या सभेची अधिक चर्चा होईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.












Click it and Unblock the Notifications