Satish Wagh Murder Case! 32 वर्षांच्या भाडेकरुसोबतच जुळले 48 वर्षांच्या मोहनी वाघचे अफेअर
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीष वाघ यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. अगोदर अपहरण न नंतर हत्या, अशा सगळ्या घटनाक्रमामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या हत्येमागे खंडणी, वाद अशा चर्चा सुरु असतानाच आता या घटनेत प्रेमाचा अँगल समोर आला आहे. मृत सतीष वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने आपल्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहिनी वाघचे अफेअर
मृत सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ ही सध्या ४८ वर्षांची आहे. त्यांच्यात खोलीत भाडेकरु असलेल्या अक्षय जावळकर (वय ३२) याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते, असे तपासात समोर आले आहे. अक्षय हा मोहिनी वाघच्या मुलाचाही मित्र आहे. म्हणजेच मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघचे अफेर जुळले. हाँटेल व्यावसायिक सतीश वाघ यांना या अफेअरची कुणकूण लागताच मोहिनी व सतीष वाघ यांचे भांडण झाल्याचेही तपासात पुढे आले.
पाच लाखांची सुपारी
मोहिनी व तिचा प्रियकर अक्षय यांच्या वयातील अंतर बघता या दोघांचे अफेअर असेल, अशी शंका कुणालाच आली नाही. अक्षय हा सुरुवातीला सतीष वाघ यांचा भाडेकरु होता. शिवाय तो त्यांच्या मुलाचा मित्रही होता. मात्र या अफेअरची कुणकुण लागताच सतीश वाघ यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. त्यानंतर या तिघांतही जोरदार भांडण झाले. तेथूनच सतीश वाघ यांच्या हत्येचा प्लॅन शिजला. मोहिनी हिने अक्षय यालाच हत्येची सुपारी देण्याचे सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.
दीड लाख रोख दिले
आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी मोहिनी हिने पाच लाखांपैकी दीड लाख रुपये अक्षयला दिले. मोहिनीने पैसे दिल्यावर तब्बल चार महिन्यानंतर अक्षयने पवन याला हत्येची सुपारी दिली. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ व विकासला सोबत घेत सतीश वाघ यांची हत्या केली. अक्षयनेच आरोपींना दीड लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आरोपींनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर गाडीतच त्यांच्यावर सपासप वार केले. १५ मिनिटांत आरोपींनी सतीश वाघ यांच्यावर ७२ वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिल्याचे आता तपासात समोर आले आहे.












Click it and Unblock the Notifications