Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यातील नवले पूल पुन्हा रक्तरंजित का झाला; 9 जणांचा बळी गेलेल्या भीषण अपघाताचे सत्य आले समोर!

Pune Navale Bridge accident Update : पुण्यातील नवले पूल परिसर पुन्हा एकदा एका भीषण दुर्घटनेमुळे हादरला आहे. मंगळवारी संध्याकाळी सातारा रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत झालेल्या या अपघाताने या ठिकाणच्या वाहतूक सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे हा मोठा अनर्थ घडला आणि रस्त्यावर सर्वत्र फक्त वाहनांचे सांगाडेच उरले.

अपघात नेमका कसा घडला?

साधारणपणे गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सातारा रोडवरून मुंबईकडे निघालेल्या एका अवजड ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेल्या या ट्रकने पुढे असलेल्या सलग २० ते २५ वाहनांना जोरदार धडक दिली.

Navale Bridge accident

गाडी चेंगरली, आग भडकली

धडक इतकी भीषण होती की, एक टुरिस्ट कार दोन कंटेनरच्या मध्ये चेंगरली गेली आणि या धडकेमुळे कारने तात्काळ पेट घेतला. काही सेकंदांत आग इतकी वाढली की कार तसेच कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. आगीच्या ज्वाळा उंचावल्या आणि रस्त्यावर वाहने विखुरल्याने संपूर्ण मार्ग ठप्प झाला.

मृतांचा आकडा आणि बचाव कार्य

या भीषण अपघातात एकूण ९ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील पाच प्रवासी आणि कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ओळख पटलेल्या व्यक्ती कोण?

कारमधील स्वाती नवलकर (३७), त्यांच्या सासू शांता दाभाडे (५४) आणि सासरे दत्तात्रय दाभाडे (५८) या तिघांचा मृत्यू झाला. तसेच, चिखलीतील तीन वर्षांची मोक्षिता हेमकुमार रेड्डी आणि कारचालक धनंजय कोळी यांचाही होरपळून मृत्यू झाला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला रोहित कदम (२५) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. ट्रकमधील मृत चालक आणि क्लिनर यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

अग्निशमन दलाचे कार्य

पुणे महापालिकेचे अग्निशमन दल अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रचंड धुरात व ज्वाळांत जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत वाहनांचे सांगाडेच उरले होते. जखमींवर पल्स हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि अन्य रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सय्यद कुटुंबातील काही सदस्य, सतीश वाघमारे, सोहेल सय्यद, ७९ वर्षीय शामराव पोटे यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

अपघाताचे कारण, लोकांची मागणी काय?

नवले पुलावरील हा अपघात केवळ ब्रेक निकामी झाल्यामुळे घडला नसून, या मार्गाची रचना आणि वाहनचालकांची बेफिकिरी याला कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

अपघातामागील कारण, NHAI चा खुलासा!

एनएचएआय (NHAI) नुसार, कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यानचा ८ कि.मी.चा रस्ता आणि त्याचा उतार (स्लोप) हा आय.आर.सी. (IRC) च्या मानकाप्रमाणे योग्य आहे. अनेक अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात. न्यूट्रलवर गाडी चालवल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना सतत ब्रेकचा वापर करावा लागतो. सततच्या वापरामुळे ब्रेक अधिक गरम होतात आणि ते निकामी होतात, परिणामी नियंत्रण सुटून अपघात होतात.

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

नवले पुल परिसरात यापूर्वीही तीव्र उतार, भरधाव वाहनं आणि अवजड ट्रकमुळे अनेक भीषण अपघात घडले आहेत. ब्रेक फेल होण्याच्या घटना वारंवार घडल्यामुळे नागरिकांनी या पुलावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे. पोलिसांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, ब्रेक फेल होण्यामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य दोष, याचा तपास सुरू आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+