Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी का केली आत्महत्या, कारण आलंय समोर

Shirish Maharaj More Suicide News : देहूत संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे.

महाराजांनी टोकाचे पाऊल का उचलले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. सर्व काही व्यवस्थित असताना त्यांच्या मनात हा विचार का आला, याबाबत त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता.

नवीन घर बांधले होते, त्यातून होती आर्थिक विवंचना

शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडण्यात आले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Shirish Maharaj More

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं?

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संघात कार्यरत, वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत...

शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. संघाचे ते प्रचारक होते. त्याशिवाय शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. "ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा," असे वादग्रस्त आवाहन केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+