Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचं फॅशन शोला उपस्थित राहण्याचं 'हे' आहे कारण कोण आहे वैष्णवी मुंडे? वाचा
Why Dhananjay Munde attended Vaishnavi Munde's fashion show : : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे 2 एप्रिलला बीड दौऱ्यावर होते. मात्र, अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नसतील. धनंजय मुंडे यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसले नाहीत. आज अजित पवारांच्या दौऱ्यात सहभागी होऊन ते परत सक्रीय होतील, असं बोललं जात होतं. मुंडे अजित पवारांच्या स्वागताला हजर असतील असं पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र, मुंडे या दौऱ्यावेळी उपस्थित नसतील, असं त्यांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर इतरही काही आरोप केले जात होते. याचदरम्यान, विरोधक व राज्यातील जनतेकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. त्यानंतर प्रकृतीचं कारण सांगत मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

धनंजय मुंडे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती, असे त्यांच्या पोस्टमध्ये नमूद आहे.
"दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त परळीतील अनेक दुकाने व एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हजर राहिले होते. त्यामुळे ते अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही उपस्थित असतील, अजित पवारांबरोबर बीडमधील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांत दिसतील", असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर दिसणार नाहीत. आता धनंजय मुंडेंनी असं ट्विट करून जाहीर केल्यावर अनेक जणांनी यावर संशय व्यक्त केला तोच बातम्या यायला लागले कि धनंजय मुंडे एका फॅशन शो मध्ये त्या दिवशी उपस्थित होते. हे ऐकून मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावला असणार आणि याबाबतचे अनेक व्हिडिओजसुद्धा समोर आले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaks साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 2, 2025
आधीच संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे पेचात सापडले आहेत त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला मग हा फॅशन शो चा प्रकार समोर आल्यामुळे सगळेच अचंबित झाले पण मात्र या फॅशन शोमध्ये मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचं कारण सांगितलेले धनंजय मुंडे मंगळवारी रात्री एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसले. धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाला रात्री उशिरा धनंजय मुंडे गेट वे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते. एकीकडे आजारपणाचं कारण सांगितलं आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याने आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. जिल्ह्यातील विकासकामं, योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस उपस्थित होते.
माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात वैष्णवी मुंडे सहभागी असल्याने धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली.माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने नुकताच सोशल मीडियात फोटो पोस्ट करत मुंबईत पार पडलेल्या फॅशन शो बाबत माहिती दिली आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि लहान मुलगी अधीश्री उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांची लेक वैष्णवी मुंडे हिची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
वैष्णवी मुंडे हिने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, Vivienne Westwood ला भारतात आणणे आणि Vivz Fashion School सोबत हा संपूर्ण शो आयोजित करणे हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा आहे. हा क्षण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किती परिश्रम आणि धावपळ झाली हे शब्दात मांडणे कठीण आहे. खादी आणि चंदेरी सिल्क सारख्या आपल्या देशी कपड्यांना व्हिव्हियन वेस्टवुडच्या आयकॉनिक डिझाईन्सच्या स्टेजवर केंद्रस्थानी आणल्याचं काम आज झालंय. हे केवळ फॅशनबद्दल नव्हते, ते वारसा आणि आधुनिकता, परंपरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कारागिरीला जागतिक स्तरावर आणणे होते.
मला असे वाटत नाही की, मी यापूर्वी कधीही एखाद्या गोष्टीत इतकी भारावलेली, चिंताग्रस्त किंवा भावनिकरित्या गुंतलेली नाही. ही केवळ एक घटना नव्हती तर ती एक जबाबदारी, प्रेमाचे श्रम आणि एक निश्चित क्षण होता. काही चित्रांमध्ये मी हास्यास्पदरीत्या अस्ताव्यस्त दिसत असले तरी, तीच माझी त्याक्षणाची उत्कंठा व उत्साही प्रतिक्रिया आहे, कारण मी शोचा एक भाग होते. मी या शोचा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे. ज्यांनी हे घडवून आणले त्या प्रत्येकाचे आभार, ही फक्त सुरुवात आहे, असे वैष्णवीने म्हटले आहे. आता धनंजय मुंडे लाडक्या लेकीचा शो बघण्यासाठी आले होते म्हटल्यावर संशयाने पाहणाऱ्या लोकांची तोंड बंद झाली आहेत.












Click it and Unblock the Notifications