महायुतीतील तिन्ही पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची नावं अन् खातेवाटप!, जाणून घ्या- कुणाला मिळणार संधी?
Mahayuti Probable Formula Update Ministry Sharing, Bjp-ShivSena-NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. यात महायुतीला प्रचंड यश मिळाले. तर जवळपास 11 दिवस उलटून देखील सरकार स्थापन झालेले नाही. अशातच, महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री पद तसेच खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याची माहिती समोर आली होती. तर आज सकाळपासून त्यांनी या मुद्द्यावरुन देखील माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे.अशातच आता महायुतीच्या खातेवाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक मंत्री हे अर्थातच भाजपचे असणार असून एकनाथ शिंदे यांच्या शि्वसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समान वाटा मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोणाकडे किती मंत्रीपद व कोणाला कोणाची लागेल वर्णी
भाजपची स्थिती काय?
महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये भाजपकडे 21 ते 22 खाती असू शकतात. यामध्ये मुख्यमंत्री, गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर मंत्रीपदाच्या यादीत प्रामुख्याने पंकजा मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची नावे समोर आली आहेत. जवळपास भाजपचे 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 ते 12 खाती मिळून शकतात. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर गृहखाते हे शिवसेनेला न मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला किती मंत्रीपद मिळणार?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार असून अद्यापही कोणाला संधी मिळणार ही माहिती समोर आली नाही. मात्र, अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याची माहिती आहे. तर छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह काही नेत्यांची नाव समोर येत आहेत.
कोणाकडे कोणते खाते असणार?
भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषद अध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू
मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची माहिती होती. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने महायुतीची बैठक झाली नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असून उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीत गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाली असून उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसेनेचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.
वर्षा अन् सागरवर घडामोडी
गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे दरवाजे पुन्हा उघड केले आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच संजय शिरसाट हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. तिथून हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर जातील. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत.
'एक है तो सेफ है'चा नारा गुंजणार
महायुतीच्या शपथविधीतही 'एक है तो सेफ है'चा नारा दिसणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात 10 हजार भाजप कार्यकर्ते 'एक हैं तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती करण्यात येणार आहे. तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications