महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
मुंबई : राज्यात पुढील दोन महिन्यात विधानसभा निवडणूका आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाचे राज्यभरात प्रचार दौरे सुरु आहेत. राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षाची ही जनसन्मान यात्रा सुरु आहे.महायुतीमधील आमदारांचे नाराजीचे सूर उमटत असल्याचं देखील बोललं जातंय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एएनआयला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत विविध मुद्यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राजकारणातील सर्व निर्णय माझेच असतात. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. कुटुंबाच्या बाबतीत माझा हा निर्णय चुकीचा आहे, असं अजित पवार म्हणाले. कुटूंबाबाबत बोलण्याचा मला अधिकार आहे.
शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला आला, तेव्हा अजित पवार यांनी 'नो कमेंट्स' म्हणत उत्तर दिलं. माझी शरद पवारांशी स्पर्धा नाही, पण मी माझ्या पध्दतीने पुढं जातोय आणि ते त्यांच्या पध्दतीने पुढे जातायेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. आम्ही सर्व आमदार एकत्र बसून ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत-जास्त महायुतीच्या जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे", असं अजित पवार म्हणाले.
आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहेत. आम्ही महायुतीतील सर्व एकत्र बसू आणि कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री होणार निश्चित झालं आहे. महायुतीच्या जास्तीत जागा कशा जिंकून येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची राजकीय शैली सारखी आहे का?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची राजकारणाची शैली सारखीच आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, प्रत्येकाची स्वतःची शैली असते, ती सारखी असू शकत नाही. जवाहरलाल नेहरूंचे वेगळे होते, इंदिरा गांधींचे वेगळे होते. राजीव गांधींचे वेगळे होते, राहुल गांधींचे वेगळे. मुलायमसिंह यादव यांचे वेगळे आणि अखिलेश यादव यांचे वेगळे. प्रत्येक पिढीतील अंतर वेगळे आहे. जुन्या पिढीतील लोक वेगळा विचार करतात, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते.












Click it and Unblock the Notifications