Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कायदा सोप्या भाषेत सांगणारा जाणकार; सुप्रीम कोर्टातील मराठी चेहरा, कोण होते सिद्धार्थ शिंदे?

Siddharth Shinde lawyer death news : महाराष्ट्रातील राजकारण आणि भारतीय संविधानाचे सखोल ज्ञान असलेले तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या गुंतागुंतीच्या निर्णयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणारे प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते केवळ 48 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अचानक आलेली अखेर

सोमवारी (15 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयातील कामासाठी गेलेले असताना सिद्धार्थ शिंदे यांना अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (16 सप्टेंबर) सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणले जाईल आणि दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Siddharth Shinde lawyer death news

कायद्याचा सोपा अर्थ सांगणारे व्यक्तिमत्त्व

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीदरम्यान, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईंचे सिद्धार्थ शिंदे यांनी केलेले विश्लेषण सर्वसामान्य जनतेला खूप महत्त्वाचे वाटले.

त्यांनी केवळ कायद्याचे निकालच नव्हे, तर त्यांचे दूरगामी परिणामही सहज समजतील अशा भाषेत समजावून सांगितले. कायद्यातील क्लिष्ट बाबी, खटल्यांचे बारकावे आणि न्यायाधीशांचा दृष्टिकोन सोप्या शब्दांत मांडण्याची त्यांची हातोटी होती.

माजी केंद्रीय मंत्र्यांचे नातू

माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे, हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची बारकाईने जाण आणि संविधानाचे गाढे ज्ञान होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे केवळ कायदेशीर क्षेत्रच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे, कारण कायद्याचे योग्य आकलन करून देणारा एक महत्त्वाचा आवाज कायमचा शांत झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+