कोण आहे 'तो' पाकिस्तानी गुंड ज्याच्याशी लॉरेन्स बिश्नोईने व्हिडिओ कॉलद्वारे साधला होता संवाद,वाचा
Lawrence Bishnoi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत टोळीच्या वतीने जबाबदारीचा खुलासा करण्यात आला. या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा बिश्नोईकडे मोबाईल फोन असल्याची चर्चा रंगली आहे. तर त्याने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भाटीशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधल्याचा व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल झाला आहे. चला तर जाणून घेऊया, पाकिस्तानी गुंड शेहजार भाटी व लॉरेन्स बिश्नोईचा काय आहे संबंध, जेलमध्ये राहुन देखील कशी चालवतो लॉरेन्स गॅंग...!
काही माध्यमांच्या माहितीनुसार, या वर्षी जूनमध्ये 19 सेकंदांची लॉरेन्स बिश्नोईची पाकिस्तानातील गॅंगस्टरची संवाद व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पाकिस्तानस्थित गँगस्टर शेहजाद भाटीशी बोलताना दिसत आहे. सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव समोर आल्यानंतर या क्लिपची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे लॉरेन्स जेलमध्ये असल्यामुळे त्याच्याकडे कोणताही स्वत:चा मोबाईल नाही. परंतु, तो जेलमधील काही लोकांचा मोबाईल वापरत असल्याची चर्चा रंगली आहे.

जेलमध्ये फोन वापरल्याचा लॉरेन्सवर आरोप
बिश्नोईवर दिल्लीच्या तिहार तुरुंगात तसेच पंजाब आणि राजस्थानच्या तुरुंगात मोबाईल फोन वापरल्याचा देखील आरोप केला गेला आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यात असाच दावा गँगस्टर कुणाल छाबरा यानेही केला होता. गँगस्टर कुणाल छाबरा याने तुरुंगात असतानाही बिश्नोईकडून खंडणीचे फोन आल्याचा दावा केला होता. सध्या लॉरेन्स बिश्नोई अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याच्या टोळीतील एखाद्याने मोठा गुन्हा केला की, लॉरेन्स हा पुढील नऊ दिवस मौन बाळगतो, असेही सांगण्यात आले, तशी प्रथाच जणू त्याने सुरू केलेली आहे.
ਪਹਿਲਾਂ, ਗੈਂਗਸਟਰ ਲਾਰੈਂਸ ਬਿਸ਼ਨੋਈ ਨੇ ਪੰਜਾਬੀ ਗਾਇਕ ਸਿੱਧੂ ਮੂਸੇਵਾਲਾ ਦਾ ਕਤਲ ਕੀਤਾ ਸੀ।
— Bikram Singh Majithia (@bsmajithia) June 18, 2024
ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ, ਬਿਸ਼ਨੋਈ ਨੇ ਗੁਜਰਾਤ ਜੇਲ੍ਹ ਤੋਂ ਪਾਕਿਸਤਾਨੀ ਗੈਂਗਸਟਰ ਸ਼ਹਜ਼ਾਦ ਭੱਟੀ ਨੂੰ ਈਦ ਦੀ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ ਦਿੱਤੀਆਂ, ਜਿਸ ਨਾਲ ਇਹ ਸਾਬਤ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਕੈਦ ਵਿੱਚ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਵੀ ਆਜ਼ਾਦੀ ਨਾਲ ਕੰਮ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ।
ਪੰਜਾਬ ਦੇ ਜੇਲ੍ਹ… pic.twitter.com/PxD9aq00xf
बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची घेतली जबाबदारी?
बिश्नोई टोळीतील एका कथित सदस्याने ऑनलाइन पोस्टमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या पोस्टमध्ये माजी मंत्री आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्यातील कथित संबंधांचाही उल्लेख करण्यात आला आहे. "सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते, पण तू आमच्या भावाचा जीव घेतलास. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जो कोणी सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करेल, त्याचा हिशोब चुकता केला जाईल, असेही त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
सलमान खानला का केले जाते टारगेट ?
1998 पासून लॉरेन्स बिश्नोई टोळीने दोन काळवीटांची शिकार केल्यावर सलमान खानला लक्ष्य करत आहे. वास्तविक, काळे हरण हा बिश्नोई समाजाचा पूजलेला प्राणी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बिश्नोई टोळीच्या कथित सदस्यांनी खान यांच्या मुंबईतील निवासस्थानी गोळीबार केला होता. नंतर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीचा पोलिस स्टेशनमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला, ज्यामुळे बिश्नोई टोळीला आणखी राग आला. मात्र, मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टच्या सत्यतेला दुजोरा दिलेला नाही. ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगची घटना असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. दोन शूटर्सना अटक करण्यात आली आहे, तर तिसऱ्याची ओळख पटली असून त्याचा शोध घेतला जात आहे.
लॉरेन्सने पाकमधील गुंडांशी साधला होता संवाद
भारतातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई, ज्यावर देशातील अनेक हायप्रोफाईल लोकांच्या मृत्यूचा आरोप आहे. मग तो सुपरस्टार सलमान खानवरील हल्ला असो किंवा गायक सिद्धू मूसवालाची हत्या असो. तुरुंगात बसून लॉरेन्स बिश्नोई त्याच्या टोळीला वाट्टेल ते करायला लावतो. आणि हे सर्व कसे घडते याचा व्हिडिओ पुरावा देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या 17 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये लॉरेन्स बिश्नोई पाकिस्तानचा कुख्यात डॉन शहजाद भट्टीसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिश्नोई शहजादला ईद मुबारकच्या शुभेच्छा देतो पण भाटी त्याला सांगतो की पाकिस्तानमध्ये ईद एक दिवस नंतर असते.
'ठीक आहे मी उद्या फोन करतो'
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी डॉन शेहजाद भाटी व्हिडिओ कॉलमध्ये आज ईद नसल्याचे सांगत आहे. हे आज दुबई वगैरे झाले आहे. उद्या पाकिस्तानात होणार आहे. यावर लॉरेन्सने विचारले की आज पाकिस्तानात नाही का? भाटी म्हणाला नाही. आज असे होणार नाही. इतर देशांमध्ये ते आज घडले आहे आणि उर्वरित उद्या होईल. यानंतर लॉरेन्स म्हणाला ठीक आहे मी उद्या कॉल करेन. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोई यांचे केस छोटे दिसत असून त्यांनी कपाळावर टिळा लावलेला होता. या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ शहजाद भाटी दुसऱ्या फोनवरून बनवत आहे.
या व्हायरल व्हिडिओनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सलमान खानवर हल्ला करणाऱ्या आणि सुपरस्टारला धमकावणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईला तुरुंगात इतकं स्वातंत्र्य मिळालं आहे का की तो सीमेपलीकडून पाकिस्तानातल्या गुंडांशी सहज बोलू शकेल? या कॉलमध्ये लॉरेन्स ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल करत आहे. आणि तो पुन्हा सांगत आहे की तो एक दिवसानंतर पुन्हा कॉल करेल, याचा अर्थ त्याला कॉल करण्यास मनाई नाही.
कोण आहे शहजाद भाटी?
डॉन शहजाद भाटीवर पाकिस्तानात गुन्हा दाखल झालेले आहे. या गुन्ह्यांमध्ये खून, जमिनीचा वाद, शस्त्रास्त्रांची तस्करी अशी प्रकरणांचा समावेश आहे. लॉरेन्सप्रमाणेच हे नेटवर्क परदेशातून चालते. अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान, दुबई येथे नेटवर्क आहे. खोखर यांच्या सहकार्याने क्राईम नेटवर्क तयार केले.












Click it and Unblock the Notifications