Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर बीडला आलेले नवीन एसपी नवनीत कांवत कोण आहेत, कायदा सुव्यवस्था राखतील का?

Who is Beed New SP Navneet Kanwat : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच तापलेलं आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत तर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणी आवाज उठवला आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचे सांगितले होते. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनीत कांवत यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बीडला नियुक्ती झालेले नवनीत कांवत कोण आहेत, जाणून घेऊया, ते बीडमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरतील का?

Who is SP Navneet Kanwat

कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कांवत?

नवनीत कांवत हे 2017 बॅचचे IPS आहेत. नवनीत कांवत हे मूळचे राजस्थानचे आहेत. नवनीत कांवत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. नवनीत कांवत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्वत:वर विश्वास ठेवून दहावीत टॉप केलं, तेव्हापासून स्वत:वरचा विश्वास वाढला.

12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केलं. आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली.

यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS बनले. त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे.

फडणवीसांनी काल सभागृहात काय म्हटलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळात बोलताना बीडच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, या घटनेमागे कोणीही भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मोक्का लावू. मी पोलिस महासंचालकांना देखील सांगितले की, यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो.

या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, असे आश्वासन दिले. त्यानंतर अवघ्या 24 तासांत बीडला नवीन एसपी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+