Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे ऋतुजा पाटील?, एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी अन् अजित पवारांची होणारी सुनबाई!, वाचा सविस्तर

who is rutuja patil jay pawar engagement : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा 10 एप्रिल रोजी ऋतूजा पाटील यांच्यासोबत साखरपुडा पार पडला.

ऋतुजा पाटील आता पवार कुटुंबाची सून होणार आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चला तर जाणून घेऊया जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत?, जय पवार यांच्याशी त्यांची कशी ओळख झाली..!

who is rutuja patil

कोण आहे ऋतूजा पाटील?

ऋतुजा पाटील या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहेत. ऋतुजा पाटील उद्योगपती प्रवीण पाटील यांची मुलगी आहे. प्रवीण पाटील हे व्यावसायिक जगात एक प्रसिद्ध नाव आहे. ऋतुजा बरीच शिक्षित आहे. ऋतुजाच्या बहिणीचे लग्नही सुप्रसिद्ध उद्योगपती केसरी ट्रॅव्हल्सच्या घरात झाले आहे. ती केसरी पाटील यांची सून आहे.

जय पवार राजकारणापासून अलिप्त

अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी अद्याप सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही. त्यांचा संपूर्ण कल हा व्यवसायाकडे आहे. ते दुबईमध्ये राहत होते आणि कॉर्पोरेट जगात सक्रियपणे काम करत आहेत. आता तो मुंबई आणि बारामतीमधील सर्व व्यवसाय ते पाहत आहेत.

आईच्या निवडणुकीत घेतला होता सहभाग

पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठ नाव आहे. जय पवार यांनी अलिकडच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाग घेतला. बारामतीत आई सुनेत्रा पवार यांना साथ दिली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांसाठी प्रचार केला. जय आणि ऋतुजा काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि आता ते लवकरच लग्न करणार आहेत.

मोदीबागेत जाऊन घेतली होती आजोबांची भेट

कोणत्याही शुभ कार्याप्रमाणे, घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद घेतले जातात. त्याचप्रमाणे, लग्नाआधी, जय पवार आणि ऋतुजा पाटील हे घरातील ज्येष्ठ सदस्य आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदीबाग येथील घरी पोहोचले होते. दोघांनीही त्यांना भेटून त्याचे आशीर्वाद घेतले. साखरपुड्याच्या या खास प्रसंगी अजित पवार आणि शरद पवार दोघेही एकत्र दिसले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+