ज्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस तो अनमोल बिश्नोई कोण आहे? बाबा सिद्दीकी मर्डरमध्ये काय संबंध घ्या जाणून
Who is Anmol Bishnoi : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. ही हत्या बिष्णोई गँगने घडवून आणल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली. या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शिवकुमार याला कालच बहराइचमधून अटक करण्यात आली आहे. संशयीत आरोपी शिवकुमार खून करून फरार झाला होता आणि तो नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होता. त्याचे अनमोल बिष्णोई याच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियासारख्या प्लॅटफाॅर्मचा वापर अनमोल बिष्णोई आणि शिवकुमार करत होता अशी माहिती समोर आली आहे. हा अनमोल बिष्णोई कोण आहे हे आपण आज जाणून घेऊया.

कोण आहे अनमोल बिष्णोई
वाँटेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई , ज्याला 'भानू' म्हणूनही ओळखले जाते, तो बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळून गेला होता आणि तो केनिया आणि कॅनडामध्ये आढळला होता. अनमोल बिश्नोई हा सलमान खानवरील हल्ला आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणीही हवा आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला असून त्याच्या अटकेवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अनमोल - शिवकुमार कनेक्शन
यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आले. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून शिवकुमारने बाबा सिद्दीकीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा मानला जाणारा शुभम लोणकर याने अनेकवेळा अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याची कबुली शिवकुमारने पोलिसांच्या चौकशीत दिली.
अनमोल बिष्णोईशी संपर्कासाठी आरोपीचा स्नॅपचॅटचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईने शिवकुमार आणि इतर नेमबाजांच्या संपर्कात राहण्यासाठी स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येत 9.9 एमएमच्या पिस्तुलाने सिद्दिकीची हत्या करण्यात आली होती. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, शिवकुमार यांनी एकूण सहा राऊंड गोळीबार केला होता. या हत्येत तीन शूटर्सचा सहभाग होता, या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक
सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक शिवकुमारसह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यांनी त्याला आश्रय दिला आणि नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केला. या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येची जबाबदारी यापूर्वीच स्वीकारलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची कबुली शिवकुमारने दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोई, काळवीट हत्या आणि सलमानशी वाद
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई यांचे नाव ठळकपणे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने बाबा सिद्दीकी यांना सलमान खानसोबतच्या जुन्या काळवीटाच्या वादामुळे लक्ष्य केले. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी शिवकुमारला अटक करून पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. तपासात आणखी काय खुलासे होतात हे पाहणे बाकी आहे.












Click it and Unblock the Notifications