उमेदवाराचे डिपॉझिप्ट जप्त म्हणजे काय? कधी होते अनामत रक्कम जप्त, वाचा सर्वकाही

When is the candidate's deposit forfeited in elections : महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. या निवडणुकीत बहुसंख्य उमेदवारांना आपले डिपाॅझिट वाचवता आले नाही. ही अनामत रक्कम कधी जप्त होते हे आपण पाहूया.

जर एखादा उमेदवार निवडून आला असेल, परंतु सर्व उमेदवारांना मिळून पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाली असल्यास विजयी उमेदवाराचीही अनामत रक्कम जप्त होऊ शकते. ही एक षष्ठांश मते म्हणजे किती हे जाणून घेऊया‌.

When is the candidate s deposit forfeited in elections

मअपक्ष उमेदवारांची संख्या अधिक

विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहत हजारो उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता निवडणुकीचा निकाल लागला. यात अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली

किती असते अनामत रक्कम

विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारास रक्कम 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारो 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. ही अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश म्हणजेच 16.67 टक्के मते मिळवण गरजेचं आहे, नाही तर अनामत रक्कम जप्त होते.

..तर मिळते अनामत रक्कम

उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून नाकारले गेले तर अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास अनामत रक्कम परत मिळते. मतदानाच्या आधी उमेदवार मृत्यू पावला तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाते. जे उमेदवार निवडून आलेले नाहीत, मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा म्हणजे 16.67 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली असतील, तरीदेखील अनामत रक्कम परत मिळेल.

महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार फडणवीस की शिंदे?

महाराष्ट्रातील निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला.या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसोबतच्या महायुतीसमोर विरोधी महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण हीच चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांचा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार यांचा गट मिळून बनलेली ही युती 288 पैकी 222 जागांवर विजयी होताना दिसत आहे. त्यामुळ भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे नक्की पण फडणवीस होतील की आणखी कोणी हे मात्र उद्या 25 नोव्हेंबरला शपथविधीच्या काळात कळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+