'सुपरमून' म्हणजे नक्की काय? काय आहे 'वुल्फ मून' कनेक्शन अन् अध्यात्मिक महत्व जाणून घ्या
What is a Supermoon : आपौष पौर्णिमेचा पवित्र दिवशी भक्तांनी नद्यांमध्ये श्रद्धेची डुबकी लावत सुपरमूनचे दर्शन घेतले. काल रात्री आकाशात २०२६ सालातील पहिले 'सुपरमून' दर्शन अनेकांना घडले. पृथ्वीच्या अत्यंत जवळ आल्यामुळे आजचा चंद्र नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. या खास खगोलीय घटनेला 'वुल्फ सुपरमून' असे नाव देण्यात आले आहे.

काय आहे 'वुल्फ मून' कनेक्शन?
जानेवारी महिन्यातील पौर्णिमेला पारंपारिकपणे 'वुल्फ मून' म्हटले जाते. जुन्या काळात कडाक्याच्या थंडीमुळे अन्नाच्या शोधात लांडग्यांचे कळप गावांच्या जवळ यायचे आणि त्यांच्या रडण्याचा आवाज रात्री दूरपर्यंत ऐकू जायचा. याच लोकमान्यतेतून जानेवारीच्या पौर्णिमेला हे नाव मिळाले आहे.
'सुपरमून' म्हणजे नक्की काय?
या चंद्राला सुपरमून का म्हणतात? हे आधी आपण जाणू घेऊया. पौर्णिमेच्या वेळी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या त्याच्या कक्षेत सर्वात जवळ असतो, तेव्हा त्याला 'सुपरमून' म्हणतात. अशा परिस्थितीत, चंद्र सामान्य पौर्णिमेपेक्षा सुमारे ७-१०% मोठा आणि सुमारे १५% अधिक उजळ दिसतो. या स्थितीला म्हणजेच चंद्र आपल्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असतो, तेव्हा त्याला 'सुपरमून' म्हणतात.
सुपरमून पाहण्याची वेळ कधी होती..
भारतात ३ जानेवारीला संध्याकाळपासून हा 'वुल्फ सुपरमून' रात्रभर पाहण्याची वेळ होती, मात्र, संध्याकाळी ५:४५ वाजता (IST) ते सर्वाधिक स्पष्ट आणि भव्य स्वरूपात दिसले. हा नजारा पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज पडली नाही, उघड्या डोळ्यांनी याचे सौंदर्य अनेकांनी अनुभवले.
सुपरमूनचे आध्यात्मिक महत्त्व
हिंदू धर्मात चंद्राला 'सोम देव' मानले जाते. पौर्णिमेचा दिवस दानधर्मासाठी शुभ असतोच, पण 'सुपरमून'च्या रात्री केलेली साधना अधिक फलदायी मानली जाते. असे मानले जाते की, या रात्री चंद्राच्या प्रकाशात राहिल्याने सकारात्मक ऊर्जा आणि मनःशांती मिळते.
(महत्वाची सूचना : या बातमीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि खगोलीय संदर्भांवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा धार्मिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)












Click it and Unblock the Notifications