Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! माहूरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गाडी दरीत कोसळली! 2 ठार, आज 2 अपघात 4 ठार, 10 जखमी

Washim Accident News : सांगोल्यानंतर आता माहुरगडावरुन दर्शनाहून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोघे जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. ही गंभीर घटना नवरात्रीतच घडली असून यामुळे भाविकांवर काळाने घाला घातला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पुसद वाशिम मार्गावरील मारवाडी फाट्याजवळ (MH16AJ 6010) या इरटिका गाडीचा आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अपघात घडला. लागोपाठ होत असलेल्या अपघाताने रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Washim Accident News

नेमका कसा झाला अपघात

याबाबत सविस्तर वृत्त असे की नवरात्रीनिमित्त माहूरगड येथील देवीचे दर्शन घेऊन भरधाव वेगात वाशिम कडे जाणाऱ्या भाविकांच्या ईरटीका गाडीच्या चालकाचा घाटातील रस्त्यावर अंदाज चुकला, त्यामुळे त्यांची कार अनियंत्रित होऊन या कारची धडक एका झाडाला लागली. यानंतर ही गाडी त्या वृक्षासह दरीत कोसळली.

मृत अहमदनगर जिल्ह्यातील

या अपघातात एक पुरुष आणि एक महिला असे दोघे जण जागीच ठार झाले तर उर्वरित सात लोक जखमी झाले. सर्व जखमींना वाशीम शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मृतक आणि जखमी हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. मात्र, या मृतांची आणि जखमींची नावे कळू शकली नाही.

आज 2 अपघात 4 जण ठार 10 जखमी

चिंतेची बाब म्हणजे आज पहाटे सांगोला परिसरातही तुळजापूर येथून दर्शनाहून येताना दोन भाविकांचा आज मृत्यू झाला. तर माहुरगडावरुन येणाऱ्या भक्तांसोबतही असाच प्रकार घडला आहे. एकूण आज दोन अपघात झाले असून चार जण ठार झाले तर दहाजण जखमी झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+