Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाल्मिक कराडवर 'मकोका', आक्रमक समर्थकांकडून परळी बंद; टायर पेटवले, बाजारपेठ केली बंद

खंडणी प्ररकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहर सध्या कडकडीत बंद झालेले असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर येत आक्रमक भूमिका घेतली आहे. जागोजागी टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला जात आहे.

दुसरीकडे,आज मकरसंक्रांतीचता सण असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांकडून देण्यात आली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती मार्ग, बस स्टँड रोड या भागात सगळीकडे बंद करण्यात आले आहे.

Walmik Karad gets makoka

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता.

मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींवर 'मकोका'

या आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आलं आहे.

वाल्मिक कराडच्या आईचा ठिय्या

पवनचक्की खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला सोडण्यात यावं, त्याला जातीय राजकारणाचा बळी केला जातोय असा आरोप करत वाल्मिक कराडच्या आईने आणि पत्नीने परळी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या पत्नीने निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये वाल्मिक कराडशी संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+