महायुती अन् महाविकासआघाडीची अग्निपरीक्षा, विधान परिषदेच्या ४ जागांसाठी आज मतदान
Mumbai: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता आज २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या चार मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. आपल्या लोकसभेच्या कामगिरीत सातत्य ठेवण्याच्या हेतूने महाविकासआघाडीने जोमाने प्रचार केला होता.
तर दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या महायुतीतील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढून विधानसभेसाठी रणशिंग फुंकण्याची संधी महायुतीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाने मतदान होते. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज (२६ जून) मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत हे मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.
नाशिक मतदारसंघात चौरंगी लढत
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात आहे.
विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने उभे आहेत. भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजारांहून अधिक मतदार आहेत.
मुंबईत ५ उमेदवारांमध्ये टफ फाईट
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गटपुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.
कोकणमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने
कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे. या गटात एकनाथ शिंदे यांनीही भाजपच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे.
मुंबई पदवीधरमध्ये भाजप आणि ठाकरेंचे शिलेदार समोरासमोर
मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य निश्चित करतील. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. तर अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे सहकारी असल्याने उद्धव ठाकरेंसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications