नांदेड लोकसभेसाठी 19 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद; वाचा, अजून कोठे होती पोटनिवडणूक
Nanded Lok Sabha By-Election 2024- महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी सहा वाजता संपले. याशिवाय आज आज 4 राज्यांतील 15 विधानसभा मतदारसंघात तसेच महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. या सगळ्यांचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. नांदेड पोटनिवडणुकीत सकाळी अकरा वाजेपर्यंत 12.59 टक्के मतदान झाले होते. अधिकृत आकडेवारी रात्री उशीरा जाहीर होईल.

विधानसभेची पोटनिवडणुकीत युपीत राडा
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मीरापूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी ककरौली पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर राजीव शर्मा यांनी तेथे उपस्थित महिलांकडे रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याचा आरोप होत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इन्स्पेक्टरकडे रिव्हॉल्व्हर दाखवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि निलंबनाची मागणी केली. तत्पूर्वी ककरौली येथेच जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. एकदा पोलिसांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. गोंधळ माजला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, निरीक्षकाने पिस्तूल काढून जमाव पांगवला.
नांदेड लोकसभेसाठी झाले मतदान
नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. त्याचा निकालही 23 नोव्हेंबरला येईल. गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यांत 26 ऑगस्टला त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर भाजपने डाँ. संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली होती. या दोघांसह या निवडणुकीत तब्बल 19 उमेदवार उभे होते.












Click it and Unblock the Notifications