Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बलात्कारातील आरोपी विशाल गवळी 'खतम'; तळोदा जेलमध्ये पहाटे ३.३० वाजता घडले 'असे' काही...

कल्याणमधील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने आज आत्महत्या केली. तळोजा जेलमध्ये बंद असणाऱ्या आरोपी विशाल गवळीने रविवारी पहाटे ३.३० वाजता जेलच्या शौचालयात गळफास लावून घेतला. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

Vishal Gawli suicide

काय होतं प्रकरण?

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कल्याण पूर्व परिसरातील चक्कीनाका भागात राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. विशाल गवळी याने या मुलीला फूस लावून त्याच्या घरी आणलं. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. संबधित प्रकार कळू नये म्हणून विशालनं त्याच्या घरातच अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगमध्ये भरुन ठेवला. हे सगळं प्रकरण पोलिसाच्या तपासात समोर आलं होतं.

सीसीटीव्ही फुटेवरुन अटक

आरोपी विशालची पत्नी साक्षी बँकेत नोकरी करत होती. ती संध्याकाळी घरी आल्यावर विशालने तिला घटनाक्रम सांगितला. विशालने पत्नी साक्षीच्या मदतीनं घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. मृतदेह बॅगेत भरुन रिक्षाचालक मित्राच्या मदतीने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगलात फेकला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून माग काढून सर्व आरोपींना अटक केली.

विशालवर कुख्यात गुन्हेगार

पोलिसांनी सलग तीन महिने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीनं गुन्ह्याच्या वापरलेले हत्यार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवी इतर वस्तू जप्त केल्या होत्या. विशालसह पत्नीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते. विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडीपाराच्या आदेशाचा भंग करणे आदींचा समावेश आहे.

आरोपीची जेलमध्ये आत्महत्या

गेल्या चार महिन्यांपासून विशाल हा तळोजा जेलमध्ये होता. विशाल गवळी यानं रविवारी पहाटे जेलमधील शौचालयात आत्महत्या केल्याचं आढळून आलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे .जे .रुग्णालयात पाठवण्यात आलाय. या संदर्भात माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. दरम्यान, पोलस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+