Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विर्ले पार्लेतील BMCने पाडलेल्या 90 वर्ष जुन्या जैन मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या महत्व

Virle Parle jain temple demolished : मुंबईतील 90 वर्षे जुने असलेले विर्ले पार्ले येथील जैन मंदिरावर महानगर पालिकेने बुलडोजर चालवला आहे. हे मंदिर पाडल्याने जैन समाज संतप्त झाला आहे. बीएमसीने केलेली कारवाई असंवेदनशील आणि एकतर्फी असल्याचं समाजातील लोकांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे मुंबईतील हे मंदिर पाडताना बीएमसीने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला आहे.

Virle Parle jain temple demolished

जैन मंदिर हे जैन समाजाच्या आस्थेचा विषय

जैन मंदिर हे जैन समाजाच्या आस्थेचा विषय आहे आणि त्यांची अतूट श्रद्धाही आहे, अशावेळी हे मंदिर पाडल्याने समाज संतप्त झाले असून या पाडकामाला जबाबदार असलेल्या संबंधितांना निलंबित करण्याची मागणी जैन समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासह आता मोर्चेही निघत आहेत.

काय होत आहेत आरोप?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, BMC टीम जेव्हा मंदिर पाडण्यासाठी आली तेव्हा जैन मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या आवारातून पवित्र ग्रंथ आणि वस्तू काढून टाकण्यासाठी वेळ मागितला पण BMC ने त्याकडे दुर्लक्ष केले आणि धार्मिक पुस्तके आणि मंदिरातील वस्तू रस्त्यावर फेकल्या गेल्या, असा आरोप केला जात आहे तर मंदिर पाडण्याला हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिल्याने जैन समाजातील सदस्यच खवळले नाहीत तर बीएमसीच्या कारवाईच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जैन समाजाचा रोष

90 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी बीएमसीने (बृहन्मुंबई महानगरपालिका) पाडले. या घटनेमुळे देशभरातील जैन समाज संतप्त झाला. मंदिर पाडल्यानंतर मंदिराच्या जागेत आरती करुन जैन समाजातर्फे 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी अहिंसक रॅली काढली. या रॅलीत मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले होते. बीएमसीच्या या कारवाईमुळे जैन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच मंदिर वही बनाऐंगे अशा घोषणा देत आहे त्या जागी मंदिराची पुन्हा उभारणी करावी ही मागणीही आता पुन्हा होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

काय आहे या मंदिराचा इतिहास?

विर्ले- पार्ले येथील जैन मंदिर 1935 मध्ये बांधले गेले होते. या मंदिराचा जिर्णोद्धार 1998 मध्ये झाला. यानंतर हे मंदिर कायदेशीर वादात अडकले, ज्यामुळे मंदिराबाबत अनेक वाद निर्माण झाले.

कुणी केले बांधकाम?

विले-पार्ले येथील जैन मंदिराच्या बांधकामाबाबत कोणतीही स्पष्ट आणि अचूक माहिती उपलब्ध नाही. काही स्त्रोतांमध्ये मंदिराच्या बांधकामाचे वर्ष 1935 दिले गेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+