Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांनी शहांवर केलेली टिका भाजपच्या लागली जिव्हारी; विनोद तावडेंनी थेट दाऊदच काढला...

शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर मंगळवारी शरद पवारांनी अमित शहांची तडीपारी काढत हल्ला चढवला होता. आता शरद पवारांची हिच टिका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. विनोद तावडे यांनी आज शरद पवारांवर थेट दाऊदचे नाव घेऊन हल्ला चढवला.

Vinod Tawde

सोशल मीडियातून दिले उत्तर

विनोद तावडे यांनी शरद पवारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले. दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकाँप्टरमधून फिरविणाऱ्या मुख्यमंत्र्‍यांपेक्षा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी सोहराबुद्दीन सारख्यांच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण आहे. अमित शहांची तडीपारी ही चोरी- दरोड्यासाठी नव्हती असे म्हणत विनोद तावडे यांनी शरद पवारांना उत्तर दिले आहे.

थेट दाऊदचे घेतले नाव

विनोद तावडे यांनी आपल्या सोशल मीडियावर पवारांवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. हेच बहुदा पवार विसरले असावेत, असा निशाणाही तावडेंनी साधला. तावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख केला.

त्यांच्याबद्दलही सांगा

तावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये सावकरांचेही नाव घेतले. ते म्हणाले, दोन जन्मठेपाांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावकर मंत्री झाले असते तर पवार साहेबांनी त्यांच्याबाबतही असंच वक्तव्य केलं असतं का? श्रद्धेय अटलजी, आडवाणीजी यांच्यासारखे अनेक नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते. ते नंतर पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयीही हेच म्हटले असते का? शरद पवारांनी हे जनतेला नक्की सांगितले पाहिजे, अशा शब्दात तावडे यांनी निशाणा साधला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+