Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विनोद तावडेंनी 5 कोटी आणले, त्यांच्या वहित 15 कोटींची नोंद, क्षितिज ठाकूरांचा आरोप, विरारमध्ये थरार

Vinod Tawde In Virar : भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला.

तावडे 5 कोटी घेऊन आले-ठाकूरांचा दावा

विवांत हॉटेलमध्ये विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर व त्यांचा मुलगा व हजारो कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले. यावेळी विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे. तसेच विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या, असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला.

Maharashtra Assembly Election 2024

डायरीत नेमकं काय सापडलं?

विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूर यांनी आरोप केला आहे. सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा खेळ खल्लास...जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

तावडेंची गाडी तपासली

विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली. ठाकूरांचे कार्यकर्ते गाडी तपासण्यासाठी मागत आहेत. मात्र आयोगाच्या टीमने गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनीच काही गैरप्रकार केला तर काय, असं विनोद तावडेंच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलिस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. तसेच मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. त्यांनी मला 25 वेळा फोन केलेत, अशेही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+