वाल्मिक कराडचा एनकाऊंटर होण्याची शक्यता, 'या' मोठ्या नेत्याने केला खळबळजनक दावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर बीड पोलिस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले. या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मोठ्या आकाला वाचविण्यासाठी वाल्मिक कराडचा एनकाऊंटरही होऊ शकतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने आपल्याला दिल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवारांचे ट्विट चर्चेत
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महायुतीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल!
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 2, 2025
वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात.
आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित… pic.twitter.com/43E58PljRO
तपासाबाबत प्रश्नचिन्ह
वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मोक्का अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेला नाही, त्यामुळे या तपासात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलंय.
वड्डेटीवार काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना विजय वड्डेटीवार म्हणाले, पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा झाला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे, असे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.
एन्काऊंटर होण्याची भीती
विजय वड्डेटीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काऊटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications