पंकजा मुंडे, भावना गवळी, प्रज्ञा सातव यांच्यासह 11 विधानपरिषद आमदारांनी घेतली शपथ
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित अकरा आमदारांचा शपथविधी पार पडत असून नुकतीच पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांनी आमदारपदाची शपथ घेतली. आज हा सोहळा विधान भवनात पार पडत आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा उमेदवार विजयी झाले होते. त्यात महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले होते.

या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले होते, तर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आश्चर्यकारकरित्या विजयी झाले होते.
या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ
पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, कृपाल तुमाने, भावना गवळी, प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर यांनी आज विधान भवनात शपथ घेतली.
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीने दिलेले सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे 3 पैकी दोन उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी 26 मतांसह ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या फेरीत 22 मतं मिळवत विजयाचा उंबरठा गाठला होता, पण तो उंबरठा पार करण्यासाठी त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली. यानंतर चुरशीच्या लढाईत त्या दोघांनीही विजय मिळवला.
विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील हे अनेक वर्षे विधानपरिषदेत आमदार होते. मात्र, आजच्या पराभवामुळे त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे.
या निवडणुकीत एकूण 288 उमेदवारांनी मतदान केलं होतं. यावेळी भाजपच्या अमित गोरखे यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी आकडा चुकीच्या पद्धतीने लिहल्यामुळे हे वाद निर्माण झाला. तर आणखी एका मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना पहिल्याच पसंतीचे मत दिल्याने हे मत बाद ठरवण्यात आले.
सर्वप्रथम भाजपच्या योगेश टिळेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे अमित गोरखे यांचा विजय झाला. यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा असलेला निकाल जाहीर झाला. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला. त्यामुळे पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. महायुतीने दावा केल्याप्रमाणे भाजप, अजितदादा गट आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
भाजपचे विजयी उमेदवार
- 1) पंकजा मुंडे - 26 मतं
- 2) परिणय फुके - 23 मतं
- 3) सदाभाऊ खोत - 26 मतं
- 4) अमित गोरखे - 23 मतं
- 5) योगेश टिळेकर - 23 मतं
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
- 1) शिवाजीराव गर्जे - 23 मतं
- 2) राजेश विटेकर - 24 मतं
शिवसेना विजयी उमेदवार
- 1) कृपाल तुमाने - 25 मतं
- 2) भावना गवळी - 24 मतं
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
- 1) प्रज्ञा सातव - 25 मतं
शिवसेना ठाकरे गट
- 1) मिलिंद नार्वेकर - 22 मतं
(ही बातमी अपडेट होत आहे)












Click it and Unblock the Notifications