माणूस म्हणावं की हैवान! मंदिराच्या गाभाऱ्यात गेला अन् पॅंट काढून..किळसवाणा प्रकाराचा Video व्हायरल!
Pune Nageshwar Mandir Video Viral : पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात अल्पवयीन मुलाने अतिशय घृणास्पद कृत्य केले. त्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
सदर मुलगा हा प्रसिद्ध मंदिराच्या गाभाऱ्यात गेला अन् पॅंट काढून त्याने त्या ठिकाणी लघुशंकेसह अश्लिल कृत्य केले. अतिशय किळसवाणा हा प्रकार समोर आल्यानंतर भाविक संतप्त झाले आहेत. तर सदर मुलावर कठोरातील कठोर कारवाईची मागणी आता भाविकांकडून केली जात आहे. हा व्हिडिओ ट्विट करून मंत्री निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर येताच तणावाची स्थिती?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात एक अल्पवयीन मुलगा शिवलिंगाच्या दिशेने गेला आणि अश्लील कृत्य केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.
याशिवाय अल्पवयीन मुलावर देखील धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
करारा जवाब मिलेगा! pic.twitter.com/9tq01QZ7JI
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 3, 2025
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतय की, अल्पवयीन मुलगा मंदिराचं पावित्र्य भंग करणारं कृत्य करीत आहे. ज्यानंतर भाविकांनी तातडीने मंदिर संस्थानाला याबाबत माहिती दिली. मंदिर प्रशासनानेही स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सदर अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. सदर मुलगा हा विविध गुन्ह्यांमध्ये यापूर्वी देखील दिसून आलेला आहे.
मंत्री निलेश राणे म्हणाले- तूला धडा शिवकला जाईल
नागेश्वर मंदिर पुण्यातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. हा व्हिडिओ ट्विट करीत भाजप नेते नितेश राणे यांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाने असं किळसवाणं कृत्य का केलं, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मुलानं असा किळसवाणा प्रकार का केला?
दौंड पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही माध्यमांशी बोलताना सांगितले की, किशोरवयीन मुलाचे हेतू आणि त्याच्या कृत्यामागील हेतू जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे. यासोबतच, हे काही सुनियोजित कटाचा भाग आहे का हे देखील पाहिले जात आहे. भविष्यात अशा घटना रोखता याव्यात यासाठी मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications