Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात माणुसकीला कलंक: नवले पुलावर कुटुंब जळत असताना मृतांच्या दागिन्यांची लुटालूट! Video व्हायरल!

Pune Navle Bridge accident looting video : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर मदतकार्याऐवजी मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असताना, या दुर्घटनेनंतर घडलेला प्रकार समाजाला चक्रावून सोडणारा ठरला आहे.

Navale bridge pune

अपघातात एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक निकामी झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यात एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली जाऊन कारने तात्काळ पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ९ ते १० जण गंभीर जखमी झाले.

कुटुंब आगीत जळत होते, काहीजण सोने लुटत होते!

ज्यावेळी अपघातग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करत होते, त्याचवेळी काही असंवेदनशील नागरिकांनी मृत आणि जखमींच्या सामानाची व दागिन्यांची लुटालूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोन ट्रकच्या भीषण धडकेनंतर रस्त्यावर पडलेली रोकड आणि मौल्‍यवान वस्तू हडप करण्यासाठी लोकांनी अक्षरशः स्पर्धाच लावली होती.

एका बाजूला अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये एकीकडे कुटुंब जळत होते आणि एका लहान मुलीसह कुटुंबातील अनेकांचा मृत्यू होत होता, तर दुसऱ्या बाजूला काही लोक निर्लज्जपणे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटत होते.

या घटनेमुळे 'सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का?' असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजभरातून या कुटुंबासाठी सहवेदनेचा सूर उमटत असताना, या लुटारूंच्या निर्ढावलेल्या वागणुकीने संतापाची लाट उठली आहे.

लुटमारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या लुटमारीचे दृश्य दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे या घटनेची निंदनीयता अधिक स्पष्ट होत आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अशाप्रकारे लुटालूट होणे हे समाजाच्या नैतिक पतनाचे सूचक मानले जात आहे.

ट्रकचालकासह तिघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालक, मालकासह तीन जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय ३५) आणि मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय ३१) या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.

ताहीर नासीर खान (वय ४५, रा. किसनगड, राजस्थान) याच्यावरही भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, १२५ (अ), (ब), ३२४ (४) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ताहीर नासीर खान गंभीर जखमी असल्याने सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+