शपथ घेताना आमश्या पाडवींचा गोंधळ; स्वतः सांगितलं गोंधळाचे कारण, पहा VIDEO

MLA Amshya Padavi's explanation- राज्यात सध्या विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांना शपथ देण्यात आली. शपथ घेताना आमदार आमश्या पाडवी यांना एकही शब्द नीट उच्चारता आला नाही. आ. पाडवींचा हा व्हिडीओ आज राज्याभर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर शपथ घेताना गोंधळ का झाला? याचं कारण स्वतः आमश्या पाडवी यांनी सांगितलं.

MLA Amshya Padvi

पाडवींबाबत नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन सुरु झालं. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडत आहे. आज शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी आमदारीकीची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले. शपथ घेताना आ. पाडवी यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता येत नव्हता. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पाडवींनी स्वतः दिली गोंधळाची माहिती

प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. पाडवी यांनी गोंधळाचे कारण सांगितले. ते म्हणाले, "माझं शिक्षण कमी आहे. त्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोलत होते. त्यानंतर मी बोलत होतो. मात्र, त्यांनी वाक्य जास्त लांब वाचलं. त्यामुळे अडचण आली. कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये चौथीपर्यंत शिकणारा मी पहिला व्यक्ती आहे. माझं शिक्षण कमी असल्याने असं झालं. तरीही मी सरपंच झालो, पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे. त्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आहे, असंही पाडवी यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+