Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' शहरात पत्नीच्या दिर्घायुष्यासाठी पती करतात वटपौर्णिमा साजरी, तर 'या' गावात पत्नी नको म्हणून..

Vat Savitri Purnima 2025 : वट सावित्री पौर्णमा हा हिंदू विवाहित महिलांचा एक महत्त्वाचा सण आहे. महिला उपवास करुन त्यांच्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी हा सण साजरा करतात. दरवर्षी हा सण मराठी महिन्यातील ज्येष्ठातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा सण आज मंगळवारी 10 जून 2025 रोजी साजरा केला जात आहे. या शुभ दिवशी महिला उपवास पाळतात आणि वट सावित्री पूजेचे विधी करतात.

सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातो. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी कामना करतात. वडाची पूजा करतात.

Vat Savitri Purnima 2025

कुडाळमध्ये पुरुष वडाला घालतात प्रदक्षिणा

स्त्री आणि पुरुष यांच्याशिवाय संसाराला पुर्णत्व येत नाही. जन्माची साथ आणि एकाच रथाची दोन चाकं ते असतात, पत्नी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते तर मग पुरुषांनीही हा मोठा विचार अमलात आणायचे ठरवले ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ या गावात... येथील काही शिक्षण संस्थेतील महत्वाचे पदाधिकारी आणि त्यांची मित्रमंडळी गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरे करत आहेत. या व्रताचं यंदाच हे सोळावं वर्ष आहे.

कशी साजरी करतात पुरुष वटपौर्णिमा

आज 10 जून 2025 रोजी वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला आपली इच्छा व्यक्त करून सर्वांच्या वतीने येथील पुरुषांचा गट वडाची यथोचित पूजा करतो. त्यानंतर सर्व पुरुष मंडळी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळतात आणि आपल्या पतीसाठी मंगलकामना करतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावात मारतात पिंपळाला फेऱ्या

पती पत्नीचे नाते म्हणजे वाद विवाद आणि मग प्रेम असेच.. पण सतत भांडणाऱ्या बायकोंमुळे त्रस्त पती पिंपळाला सात फेऱ्या मारत प्रार्थना करतात, हो ही बाब खरीय..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी या गावात ही प्रथा आता रुढ होत आहे. 7 जन्म काय 7 मिनिट तू नको असे म्हणत पत्नीपीडित पुरुष संघटनेतील पुरुष सदस्य पिंपळाला फेऱ्या मारतात. आजही पिंपळाला वटपौर्णिमेनिमित्त येथे काही पुरुषांनी फेऱ्या मारल्या.

...म्हणून पिंपळाला मारतात फेऱ्या

पुरुषांनी पिंपळाच्या झाडाभोवती उलट्या फेऱ्या मारून न्यायव्यवस्थेतील "एकतर्फी" व कायद्याचा "दुरुपयोग" होणार नाही, यासाठी प्रार्थना केली. महिलांमुळे त्यांच्या पतींचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन कायद्याचा दुरुपयोग करून विस्कळीत झाले आहे. सरकारने महिला सबलीकरणासाठी विविध कायदे तयार केले. पण त्यांचा खोट्या गुन्ह्यांमध्ये वापर होऊन, अनेकदा पती व कुटुंबीयांवर जबरदस्तीने आरोप लावले जातात. या प्रक्रियेत पुराव्याऐवजी, पुरुषांना अडकवले जाते, ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा शारीरिक व मानसिक छळही होतो. या गोष्टींचा निषेध म्हणून ही संघटना पिंपळाला फेऱ्या मारतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+