Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Vanraj Andekar Murder : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा पुण्यात गोळ्या झाडून खून!

Vanraj Andekar Murder : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवार (1 सप्टेंबर) रोजी रात्री पुण्यात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना पाच गोळ्या लागल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, शहरातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली. येथे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर गोळ्यांच्या पाच फैरी झाडण्यात आल्या.

Vanraj Andekar Murder

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आंदेकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार आंदेकर यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक जखमा झाल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पुणे महानगरपालिका राज्य प्रशासकाच्या अखत्यारीत आणण्यापूर्वी वनराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (पक्ष फुटीआधी) संबंधित होते.

मेहुण्यावर संशय...

वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला, तर काही तरुणांनी धारदार कोयत्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. घर व दुकानाच्या कौटुंबिक वादातून आंदेकर यांच्या बहिणीचा पती गणेश काेमकरने साथीदारांसह त्यांच्यावर गोळीबार केल्याचा संशय आहे.

अंधारात गोळीबार कोयत्याने वार

घटनेनंतर आंदेकर समर्थकांनी समर्थ पोलिस ठाणे व केईएम हॉस्पिटल परिसरात गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळ व नाना पेठ परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

राजकीय इतिहास गुन्हेगारीचा

वनराज आंदेकर 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या कुटुंबाचा राजकीय आणि गुन्हेगारी इतिहास आहे. त्यांची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर या दोघांनीही नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांची बहीण वत्सला आंदेकर पुण्याच्या महापौर होत्या.

सूर्यकांत आंदेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदेकर टोळीचा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व इतर गुन्हेगारी कारवायांचा मोठा इतिहास आहे. प्रभाव कमी होऊनही, टोळ्यांमधील अलीकडील तणाव आणि अतुल कुदळे यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न यामुळे पुन्हा हिंसाचार उसळला आहे. टोळीचे घसरत चाललेले वर्चस्व आणि अंतर्गत निराशा हे अलीकडील हिंसाचारास कारणीभूत ठरले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+