Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण होते वनराज आंदेकर? का झाला खून, कुणाशी होतं वैर वाचा कुटुंबाची राजकीय अन् गुन्हेगारी पार्श्वभुमी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ इथं गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. पाच गोळ्या झाडल्यानंतरही वनराज यांच्यावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.

पुण्यात ही घटना घडल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिस तपास करत आहेत पण प्रश्न हा की. वनराज यांचा खून का झाला...त्यांचं कुणाशी वैर होतं का हाही प्रश्न आहे. कोण आहेत वनराज आंदेकर, त्यांच्या कुटुंबाची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आणि त्यांचा खून का झाला...हे जाणून घेऊया.

Vanraj Andekar Murder Case Vanraj Andekar Biography  Family Political and Criminal Background

राजकीय पार्श्वभुमी

वनराज आंदेकर हे 2017 साली पुण्यात झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत निवडणूक आले होते. 2022 पर्यंत कालावधीत वनराज आंदेकर यांनी नगरसेवकपद भुषवलं. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं.

वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. तर त्यांची बहिण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या. त्यांच्या घरात राजकीय वारसा आहे. पुणे महानगर पालिकेत वीस वर्षांपासून त्यांचे कुणी ना कुणी प्रतिनिधी राजकारणात होते.

कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभुमी

पुण्यात मोहळ,गजा मारणे यांच्यासह आंदेकर टोळीचाही अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकर यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचं समोर आलं आहे.

गुन्हेगारी इतिहास..

सूर्यकांत आंदेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदेकर टोळीचा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व इतर गुन्हेगारी कारवायांचा मोठा इतिहास आहे. प्रभाव कमी होऊनही, टोळ्यांमधील अलीकडील तणाव आणि अतुल कुदळे यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न यामुळे पुन्हा हिंसाचार उसळला आहे. टोळीचे घसरत चाललेले वर्चस्व आणि अंतर्गत निराशा हे अलीकडील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचं बोलले जाते. हे जरी खरं असलं तरी पुण्यात मात्र, गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळं आगामी काळात पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे हे नक्की.

वडिल शिक्षा भोगून आले बाहेर

आंदेकर माळवदकर टोळीयुद्धात खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकर जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला. बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती असं सांगण्यात येत आहे. दहशतीमुळं स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आंदेकर टोळीकडून अलिकडेच अतुल कुडले याच्या खुनाचाही प्रयत्न झाला. वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला असल्याची माहिती समजते.

जमीनीच्या वादातून दुसरा मोठा खून

वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये त्याचा निकटवर्तीय नातेवाईकाचा सहभाग असल्याचं पुढं आलं आहे. यासह आणखी दोन संशयितांची नावं पुढं आली आहे. घर आणि दुकानाच्या वादातून हा खून झाल्याचं पुढं येत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा पुण्यात गोळ्या घालून खून झाला होता. त्यानंतर पुणे शहरात पुन्हा गँगवारचे ढग दिसून आले आहे. जमीनीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता वनराज आंदेकर यांचा खून झाला. हा खून अतिक्रमण आणि घर आणि दुकानाच्या वादातून झाल्याचं बोललं जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+