अपराधी कोण? वाल्मिक कराडचा 'तो' फोटो ट्विट करत संजय राऊतांचा प्रश्न; राजकारणात एकच चर्चा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे स्टेटमेंट ऐकायला येत आहे. फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली असली तरी फरार आरोपी अद्याप हाती लागलेले नाही. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड यांचा एक फोटो ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

काय राऊत यांची पोस्ट?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राऊत यांनी सोशल मीडिया साईटवर एक फोटो ट्विट केला आहे. त्यात वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार असे तिघेही नेते आहेत. तो फोटो पोस्ट करुन संजय राऊत यांनी नेमका अपराधी कोण?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
व्वा! क्या सीन है??
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2024
नक्की कोण कुणाचा आका?
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde pic.twitter.com/a4jw2kWT6V
काय म्हटले संजय राऊत?
मुख्यमंत्री व दोन्ही उमपमुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या वाल्मिक कराडचा फोटो पोस्ट करत खा. संजय राऊत यांनी त्या फोटोखाली लिहलं आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक? असे राऊत यांनी म्हटलं आहे. या फोटोला त्यांनी संतोष देशमुखचा अपराधी कोण? असे कॅप्शन दिले आहे.












Click it and Unblock the Notifications