Valmik Karad : वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात! विष्णू चाटेनी दिली 'त्या' संभाषणाची कबुली...
Valmik Karad's conversation with windmill company : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणी वेगाने तपास होत आहे. पवनचक्की प्रकरणात दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील संशयित विष्णू चाटे सध्या पोलिस कोठडीत आहे, त्याने दिलेल्या कबुलीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचे पाय खोलात गेले आहेत.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यांनी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती तक्रार
विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती, कराडने पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने कबूल केलं आहे, त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कबुलीत काय म्हणाला विष्णू चाटे
खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याची ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्याने गुन्ह्याती घडमोडीसंदर्भात कबुली दिली. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केले होते, वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
अहवालामध्ये खुलासा काय?
सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याची कबुलीही पोलिसांकडे विष्णू चाटेने दिली आहे.
कोण आहे विष्णू चाटे?
- विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता.
- त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते.
- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले.
- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.












Click it and Unblock the Notifications