मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली ICU मध्ये उपचार! 6 महिने जेलमध्येच मुक्काम
Valmik Karad's condition worsens treatment in ICU : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली. देशमुख यांच्या अपहरणात आरोप असलेला संशयित वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. कालच पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण यानंतर 22 जानेवारीला रात्री त्याची प्रकृती बिघडली. यातून कराडला रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर काहीकाळ आयसीयूतही उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्याच्या समस्या उद्भवल्या
वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून त्याला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या वाल्मिक कराड याच्या पोटाला त्रास होत आहे. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाल्मिक कराडची सोनोग्राफी केली, मध्यरात्री रुग्णालयात भरती
वाल्मिक कराड याला पोटाला त्रास होत असल्याने त्याची सोनोग्राफी करण्यात आली आहे. यासह त्याची मधूमेह आणि रक्तदाबाची तपासणीही करण्यात आली. 22 जानेवारीला मध्यरात्री त्याला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आले यानंतर त्याला येथीलच सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आता सहा महिने वाल्मिक कराड जेलमध्येच राहणार
वाल्मिक कराडवर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तो स्वःत पोलिसांना शरण आला होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिस कोठडी त्याला न्यायालयाने सुनावली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, इतर संशयितांसोबतच वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला. आता या कलमाखाली संशयिताला किमान 180 दिवस जामीन मिळत नाही. त्यामुळे वाल्मिक कराडचा सहा महिने जेलमध्येच मुक्काम राहणार आहे.
14 दिवस न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यावर मौखोका दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 22 दिवसांची पोलीस कोठडी होती. बुधवार दिनांक 22 रोजी कोठडी संपल्याकारणाने वाल्मीक कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष सत्र न्यायाधीश मकोका सुरेखा आर. पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
22 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर वाल्मीक कराड याला जिल्हा सत्र न्यायालय येथे बुधवारी 22 जानेवारीला हजर केले होते. सुनावणी दरम्यान पोलिस यंत्रणेकडून तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयामध्ये सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष सत्र न्यायाधीश मकोका श्रीमती सुरेखा आर. पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षाचे सरकारी वकील बाळासाहेब दत्तात्रेय कोल्हे हे सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली. गुरुवारी दिनांक 23 रोजी केज येथील खंडणी प्रकरणांमध्ये सुनावणी केली जाणार आहे.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आला. यानंतर या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराडसह मुख्य संशयित आरोपींना अटकही झाली.












Click it and Unblock the Notifications