Vaishnavi Hagawane Case : शशांक अन् सुशील हगवणेंना मोठा दणका! पोलिस विभागाकडून आता 'ही' कारवाई
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचे शस्त्र परवाने पोलिस विभागाने रद्द केले आहेत. त्यांची शस्त्रेही पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या राजेंद्र हगवणे यांची लहान सून असलेली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना 16 मे रोजी घडली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना देखील ताब्यात घेतले. दरम्यान याआत्महत्येच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.

पोलिसांकडून कसून तपास सुरु
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबातील संशयितांची अटक प्रक्रिया पार पाडली. या प्रकरणात संशयितांची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी हगवणे कुटुंबियाच्या घरातील इलेक्ट्राॅनिक साहित्य, मोबाईल आणि लॅपटाॅपची तपासणी सुरु केली. त्यातून काही आपत्तीजनक गोष्टी समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस विभागाची कारवाई
दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणे कुटुंबातील शशांक आणि सुशिल हगवणे यांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यासंबंधित कारवाई केली. या दोघांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून त्यांची शस्त्रही पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.
वैष्णवीच्या मोठ्या जावेकडून आरोप
मृत वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हीने देखील सासरच्या कुटुंबाबाबत हादरवणारी माहिती दिली आहे. याप्रकरणात नणंद करिश्मा हगवणे वर देखील तीने धक्कादायक आरोप केलेले आहेत. घरातील प्रत्येक निर्णय हा करिश्मा म्हणजेच 'पिंकी' घ्यायच्या असं तिने सांगितलं. त्याचबरोबर वैष्णवीने आपल्या मैत्रीणीला घरातील त्रासाबाबत सांगताना नणंदेने त्रासाचा उल्लेख केला होता. वैष्णवीच्या वडिलांनी देखील विविध माध्यमांशी बोलताना करिश्मा हगवणे उर्फ पिंकी ताईच्या कारनाम्याची कहाणी सांगितली.












Click it and Unblock the Notifications