Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Vaishnavi Hagawane Case | वैष्णवी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

vaishnavi hagawane case update

पहाटे 4 वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना अटक केली. दोघांनाही आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे कोर्टाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सादर केला तपासाचा अहवाल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या साक्षांमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, वैष्णवीला तिच्या पतीने लोखंडी पाईपने मारहाण केली होती.

पोलिसांनी ती वस्तू जप्तही केली असून, तिचा तपासासाठी वापर केला जाणार आहे. यामुळेच पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2) नुसार गंभीर आरोप वाढवले आहेत.

वकिलांची प्रतिक्रिया

न्यायालयीन सुनावणीनंतर वैष्णवीच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. वकिल शिवम निंबाळकर यांनी सांगितलं की, "आज फक्त दोन आरोपी कोर्टात हजर होते. कोर्टाने त्यांना 5 दिवसांची कोठडी दिली आहे. तपास सुरु आहे. अजून काही मुद्देमाल जप्त व्हायचा आहे, तसेच फरारी असताना यांना कुणी मदत केली का? हे देखील तपासायचं आहे."

निंबाळकर यांनी पुढे स्पष्ट केलं की, "हगवणे कुटुंबाकडून मिळालेली फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी आधीच ताब्यात घेतली आहे, मात्र अजून काही हत्यारं आणि पुरावे जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती."

इतर आरोपींची स्थिती काय?

वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तीन आरोपींची कोठडी 26 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्या दिवशी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलिसांनी सूचित केलं आहे की, पुढील तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

16 मे रोजी वैष्णवी हगवणे ही आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये लग्नात 51 तोळे सोने, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी दिल्यानंतरही हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तिच्यावर मानसिक तसेच मारहाण झाल्याचं पोस्टमार्टममध्येही स्पष्ट झालं.

पुढचं पाऊल काय?

आता पोलिसांचा तपास आणखी गडद होणार आहे. आरोपींच्या मोबाईल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फूटेज, आर्थिक व्यवहार यांची चौकशी होणार आहे. तसेच, वैष्णवीच्या मृत्यूमागे आणखी कोणी जबाबदार आहे का, याचा शोध लावण्यासाठी तपास अधिक खोलात जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+