विधानसभेनंतर अजित पवार संपतील, बारामतीत ते 75 हजार मतांनी पडतील; शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा

Uttamrao Jankar on Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000 मतांनी पडतील, असा दावा शरद पवार गटाचे नेते तथा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला.

उत्तमराव जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते. या निवडणुकीनंतर त्यांचे राजकारण संपलेले असतील. त्यानंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील, असा टोलाही जानकरांनी लगावला.

Ajit Pawar

माळशिरसमध्ये भाजपला उमेदवार मिळवून देतो

उत्तमराव जानकर म्हणाले की, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरू आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+