Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ujjwal Nikam : कसाबला फासावर लटकावण्यात मोठी भुमिका बजावणाऱ्या उज्ज्वल निकम यांना खासदारकी!

Ujjwal Nikam : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार कसाबला फासावर लटकवण्यात मुख्य भूमिका बजावणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्रातील माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती नामानिर्देशीत खासदार म्हणून ही नियुक्त करण्यात आली, त्यांच्याशिवाय आणखी तिघांची राष्ट्रपती नामानिर्देशित राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

Ujjwal Nikam

निष्णात सरकारी वकील आणि नामवंत कायदेतज्ज्ञ

उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील नामवंत, निष्णात वकील असून सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह अनेक महत्वाचे खटले लढले आणि त्यात विजय मिळवला आहे. ते नामवंत कायदेतज्ज्ञ म्हणून देशात परिचित आहेत.

Take a Poll

निकम यांच्यासह तिघांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारकी

एनआयच्या वृत्तानुसार, भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 80(1)(a) आणि त्याच कलम (3) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार, उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणे हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम; केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते; भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला; आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेच्या प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित केले आहे. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर ही नामांकने आली आहेत असे या वृत्तात म्हटले आहे.

निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव

उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वर्षा गायकवाड 16 हजार 514 मतांनी जिंकल्या त्यांना 4 लाख 45 हजार 545 मतं मिळाली तर उज्ज्वल निकम यांना 4 लाख 29 हजार 31 मतं मिळाली होती.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

  • उज्ज्वल निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे मराठी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी झाला. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते आणि त्यांची आई गृहिणी होती.
  • विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी जळगाव येथील केसीई सोसायटीच्या एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.
  • उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत हा मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी वकील आहे.
  • उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी झाला. ते माजी विशेष सरकारी वकील आहेत. त्यांनी खून आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये काम केले आहे.
  • उज्ज्वल निकम यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून खटला आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याची यशस्वी धुरा सांभाळली.
  • 213 च्या मुंबई सामूहिक बलात्कार खटला, 2016 च्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात ते विशेष सरकारी वकील देखील होते.
  • उज्ज्वल निकम यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने युक्तिवाद केला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+