कळमनुरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना, संतोष बांगर यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कोण टक्कर देणार?
Uddhav Thackeray's Shiv Sena is challenged by Santosh Bangar in Kalmanuri : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, आता शिवसेनेची पकड मजबूत आहे. मात्र, मागील तीन वर्षांत शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे पक्षाची ताकद विभागली गेली आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिंदे गटाचे संतोष बांगर करीत आहेत. आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळी महायुतीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे या मतदारसंघावर महविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचा दावा मजबूत आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सरळ सरळ लढत होऊ शकते. पण, वंचित बहुजन आघाडीचेही या मतदारसंघात चांगले संघटन आहे. या ठिकाणी वंचितचा उमेदवार कोण असणार यावर निवडणुकीचे गणित ठरणार आहे.

जातीय समीकरणे अशी
आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील ही जागा कोणत्या घटक पक्षाला सोडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कळमनुरी मतदारसंघाचे राजकारण मुस्लीम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच अवलंबून आहे.
सध्या काय चित्र आहे?
कळमनुरी विधानसभा मतदारसंघांत गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर दुसऱ्या क्रमांकावर होते. पण, आता अजित मगर शिवसेना ठाकरे गटात आहेत. वंचितला या मतदारसंघात तगडा उमेदवार मिळाला तर याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी तालुक्यात विविध विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे ते जास्तच चर्चेत आहेत. महायुतीने सिटिंग गेटिंग हे तत्त्व स्वीकारल्यास संतोष बांगर हे पुन्हा उमेदवार असू शकतात.
आता महाविकास आघाडी ही जागा कोणाला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघात शिवसेना काँग्रेस अशी लढत आतापर्यंत होत आली आहे. मात्र आता ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक असल्याने ठाकरे गटाला ही जागा सुटू शकते. यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, जिल्हा प्रमुख अजय ऊर्फ गोपू पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, शेतकरी नेते अजित मगर इच्छुक आहेत.
गतवेळी काय झाले होते?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. शिवसेनेचे संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांचा 16 हजार 378 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. आता मगर ठाकरे गटात आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली शिवसेनेच्या हेमंत पटेल यांचा 1 लाख 86 हजार 2 मतांनी पराभव केला. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
या आहेत समस्या
आमदार संतोष बांगर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सुखदुःख ते मतदारांसोबत असतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघातून महामार्ग गेलेला आहे. परंतु, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. रोजगार, शेतमालाला अल्प भाव या समस्या आहेत. औंढा नागनाथ येथे भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications