Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्लॅनिंग! 36 पैकी या 25 जागा लढवणार?

मुंबई : शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची पिछेहाट झाली. पण त्यांना जनतेच्या मिळालेल्या मोठ्या पाठींब्याच्या जोरावर लोकसभेत त्यांच्या पक्षाने यश मिळवले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील सर्वांचाच विश्वास दुनावला आहे. विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी ठाकरेंचा पक्ष करीत असून मुंबई जिंकण्यासाठी 36 पैकी या 25 जागा ते लढवणार असल्याची शक्यता आहे.

ठाकेर मुंबईचा गड जिंकणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत नऊवेळा हजेरी लावली होती. लोकसभा निवडणुकीत मोठा प्रचार पंतप्रधानांनी केला होता. यामुळे भाजपला मुंबई जिंकायचीच हे स्पष्ट झाले होते.

Uddhav Thackeray will take 25 seats in Mumbai

लोकसभा निवडणुकीत मुंबई अपेक्षेप्रमाणे भाजपला जिंकता आली नाही. तर बहुमतांशी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला समिश्र यश मिळाले व ते त्यांचा हेतू साध्य झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे मुंबई जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. यासंदर्भात 'एबीपी माझा'नेही वृत्त दिले आहे.

उद्धव ठाकरेंकडून प्लॅनिंग

विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासूनच राहीली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली आणि मुंबईत रुजवलेली शिवसेना राज्यातही तितकीच वाढली. मुंबई आणि शिवसेना हे समिकरण ठरलेले पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षात फुट पडली आणि मुंबई दोन शिवसेनेत विभाजित झाली. त्यामुळे मुंबईतील सर्व जागा जिंकण्याचे प्लॅनिंग ठाकरे करीत आहेत.

बालेकिल्ला स्वतःकडे ठेवणार

लोकसभेप्रमाणे विधानभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पक्ष आग्रही आहे. महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहे. ठाकरे आगामी विधानसभाही महाविकास आघाडीतून लढवणार आहेत. त्यामुळे मुंबईतील 36 जागांपैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.

यांना मिळणार तिकीट?

वांद्रे पूर्वमधून आदित्य ठाकरेंचे मित्र आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या, त्यातील 8 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तर 6 आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे यश पाहता अनेक इच्छुक या मतदारसंघात आहेत.

'या' जागा लढवणार?

  • शिवडी, भायखळा वरळी
  • माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम
  • विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व
  • दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला
  • कलिना, दहिसर, गोरेगाव
  • वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले
  • कुलाबा, वडाळा,चांदीवली
  • बोरिवली,मलबार हील, अणुशक्ती नगर
  • मानखुर्द, शिवाजीनगर
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+