एकत्र राहण्यासाठीचं एकत्र आलोय ! उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंचा मेळावा सुरू झाला आहे. राज ठाकरे यांचे भाषण संपले असून आता उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू झाले आहे. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं सर्वात मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

1. शिंदेंवर जोरदार टीका "झुकेगा नही" ते "उठेगा नही"
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात' घोषणेवर बोचरी टीका करताना म्हटलं, "एका गद्दाराने काल जय गुजरात म्हटलं. 'पुष्पा' चित्रपटातला दाढीवाला 'झुकेगा नही' म्हणतो, पण हा दाढीवाला म्हणतो 'उठेगा नही साला'. काहीही झालं तरी उठणार नाही."
2. भाजपावर उपहासात्मक हल्ला - "लग्नात बोलावू नका"
ठाकरे यांनी भाजपच्या कारभारावर मिश्किल शैलीत निशाणा साधताना सांगितलं, "कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलावू नका. जेवायला येतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील, नाहीतर नवरी पळवून नेतील."
3. भाजपची फोडा आणि राज्य करा नीती
"भाजपने 'बांटो और राज करो' ही नीती वापरून मराठी समाजात फूट पाडली. मराठी माणूस एकमेकांतच भांडत राहिला. आपण त्यांच्या पालख्या वाहिल्या, आता ठरवायचं - आपण 'पालखीचे भोई' होणार की मायमराठीला त्या पालखीत बसवणार?"
4. मराठी एकता आणि चेतावणी
ठाकरे म्हणाले, "संकट आलं की मराठी माणूस एकत्र येतो, पण नंतर एकमेकांत भांडतो. हा नतद्रष्टपणा आता थांबवायला हवा."
5. हिंदीवर विरोध - "हिंदू आणि हिंदुस्तान मान्य, पण हिंदी नाही"
"भाजप पूर्वी सांगत होते - एक देश, एक विधान, एक निवडणूक. आता 'हिंदी, हिंदू, हिंदुस्तान' असा नवा नारा दिला जातोय. हिंदू आणि हिंदुस्तान आम्हाला मान्य आहेत, पण हिंदीचं दडपण आम्ही सहन करणार नाही."
6. हिंदुत्वाबाबत स्पष्ट भूमिका - "आम्ही मराठी बोलणारे हिंदू"
"आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणतात, पण आम्ही कडवट हिंदू आहोत - १९९२ च्या दंगलीत ते दाखवून दिलं. आम्ही मराठी बोलणारे हिंदू आहोत, आमच्यासारखा धर्माभिमानी दुसरा नाही."
7. ठाकरे-राज एकत्र येण्यावर भावनिक भाष्य
भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे म्हणाले, "आज आम्ही दोघं एका व्यासपीठावर आलो आहोत. आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतानी दूर केला.












Click it and Unblock the Notifications