देवेंद्र फडणवीसांसोबत लिफ्टमधून एकत्रित प्रवास, उद्धव ठाकरे म्हणतात…
Mumbai: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रवासाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलच उधाण आलं आहे. दरम्यान यावेळी विविध विषयांवर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर घणाघाती टीका केली.

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, उद्या घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो अशा शब्दांत ठाकरेंनी उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली याबद्दल सरकारनं खरं बोलायला हवं. हे खोके सरकार आहे. हे महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. सरकारला लाज लज्जा शरम नसल्याचा टोला ठाकरेंनी यावेळी लगावला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचतारांकित शेती करतात असा टोला लगावत ठाकरे म्हणाले, राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.
१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.
डबल इंजिन सरकार आलंय, कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी ठाकरेंनी यावेळी केली.
चंद्रकांत पाटलांनी मला चॉकलेट दिलं, पण...
चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. चंद्रकांतदादांनी मला चॉकलेट दिलं. आता लोकांना आश्वासनाचं चॉकलेट देऊ नका असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, उद्या काही घोषणा करणार असाल तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तिची अंमलबजावणी करायला देऊ नका.
त्यांचं चंद्रपुरातील भाषण हिणकस होतं. माता भगिनींना शिव्या देणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकता अशा मंत्र्याला तुम्ही योजना राबवायला देऊ नका अशा शब्दांत ठाकरेंनी महायुती सरकारवर प्रहार केला
लिफ्टमधील प्रवास योगायोगाने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा लिफ्टमधील एकत्रित प्रवास योगायोगाने झाल्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. "ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे" असं काही नाही. योगायोगाने झालेली भेट होती अस म्हणत उद्धव ठाकरेंनी चर्चांवर पडदा टाकला.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications