रुग्णालयातून आल्यावर ठाकरे पहिल्यांदा कडाडले; म्हणाले, तो गद्दार निघाला...
Uddhav Thackeray : मी दीपक साळुंके यांच्या हातात मशाल दिली आहे. ती घराघरांत पोहोचवा. त्याची धग दाखवून द्या. आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी आज मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे साळुंके यांची उमेदवारीच जाहीर केली. खा. संजय राऊत, माजी खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
चटके कुणाला द्यायचे, हे तुम्ही ठरवा
ठाकरे म्हणाले, दीपकआबाच्या हाती मशाल दिली. याचा अर्थ ज्यानं-त्यानं समजून घ्यावा. ही मशाल कशी पेटवायची व कुणाला चटके द्यायचे, हे तुम्ही ठरवा. दीपकआबा पक्षात आले म्हणजे विजय पक्का आहे. गद्दार नुसते गद्दार नाहीत, तर ते खोकेही घेऊन बसले आहेत. धनुष्यबाण आणि मशाल याबाबत ते संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे मशाल घराघरात पोहोचवा, असे आव्हानही ठाकरे यांनी साळुंके यांच्या कार्यकर्त्यांना केले.

तुम्ही माझ्यासोबत आहेत, हे दाखवून द्या
ठाकरे यांनी सांगोलेकरांना आवाहन केलं. ते म्हणाले, दीपक आबांच्या हाती मशाल दिली, तिची धग प्रत्येकाला दाखवून द्या. मी सभेला आल्यावर विस्तारानं बोलेल. सांगोल्याचा आधी निवडून दिलेला आमदार गद्दार निघाला. तुम्ही मात्र माझ्यासोबत आहात, हे दाखवून द्या. माझ्या शब्दाला जागाल आणि आमदार निवडून आणाल, असं म्हणत ठाकरेंनी साळुंके यांच्या तिकीटावर अनौपचारीक शिक्कामोर्तबच केलं.












Click it and Unblock the Notifications