Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीसाठी एकनाथ शिंदेंची परवानगी? नेमकं कारण काय? राजकारण ढवळलं

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आज भल्या सकाळी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट सुमारे तासभर चालली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले. शिंदे गट व मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करणार असल्याच्या चर्चा, यानिमित्ताने सुरु झाल्या. मात्र या भेटीमागे राजकीय कारण नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray meets Uday Samant

सकाळी सकाळी झाली भेट

शनिवारी सकाळी मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर आपल्याला भेटायला बोलावलं होतं, असं भेटीनंतर मंत्री सामंत यांनी सांगितलं. मनसेने मराठी भाषेबाबत आक्रमक भूमिका घेतली असली तरी, मंत्री सामंत यांची ही भेट राजकीय असल्याची चर्चा होती. या भेटीसाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने आलो असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले.

काय म्हणाले मंत्री सामंत?

या भेटीनंतर मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषेसंदर्भात ज्या घडामोडी सुरू आहे, त्याच संदर्भात बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी मला बोलावलं होतं. इथे येताना मी एकनाथ शिंदेंना सांगून, त्यांची परवानगी घेऊन आलो. महाराष्ट्रामध्ये काही बँका, संस्थांमध्ये अजूनही मराठीत बोलले जात नाही. त्याचा प्रतिबंध कसा करायचा यांसदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंशी बोलेन. त्यात काय सुधारणा करण्यात येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे उदय सामंत म्हणाले.

ठाकरेंच्या भुमिकेशी सहमत

मंत्री सामंत म्हणाले, बाकीच्या भाषांचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची आणि आमची देखील भूमिका आहे. मराठी भाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असे सामंत यांनी नमूद केलं.

मनसे- शिंदेगट युती होईल?

ही भेट राजकीय नव्हती असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी काही दिवसांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ही भेट त्यासंदर्भात होती का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवसेना शिंदे गट व मनसेत युती होईल का, हे आगामी काळात पहावे लागणार आहे. परंतु मंत्री सामंत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे बोलून दाखवले. मात्र आपण या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने आलो आहोत, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+