ताज हाँटेलचा धोका पुन्हा टळला..? एकाच नंबर प्लेटच्या, एकाच कंपनीच्या दोन गाड्या आल्या अन् नंतर...
मुंबईत गेट ऑफ इंडियाच्या जवळ असलेल्या ताज हॉटेलमध्ये २६/११ चा हल्ला झाला होता. या आठवणी ताज्या असतानाच याच ताज हाँटेलमध्ये आज पुन्हा एक विचित्र प्रकार समोर आला. एकाच नंबरच्या व एकाच कंपनीच्या दोन गाड्या ताज हाँटेलच्या पार्कींगमध्ये आल्या. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब आल्यावर तत्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. सध्या या प्रकणाची चौकशी सुरु आहे.

नेमके काय झाले..?
मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेलमध्ये आज एकाच क्रमांकाची नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्या. MH 01 EE 2388 हा क्रमांक दोन गाड्यांवर होता. या दोन्ही गाड्या मारुती सुझुकी कंपनीच्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी आरटीओला बोलवून बनावट नंबर प्लेटच्या गाडी चालकाला ताब्यात घेतले. त्याने ही गाडी ताज हॉटेलमध्ये का आणली? त्याचा त्यामागे काय उद्देश होता? बनावट नंबर प्लेट का लावली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहे.
गाडी पोलिस ठाण्यात
दोन्ही गाड्यांवर MH 01 EE 2388 हा क्रमांक आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यातील बनावट गाडी शोधून ती कुलाबा पोलिस ठाण्यात आणली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात त्या कार चालकाची कसून चौकशी केली जात आहे. त्या चालकाने कार ताज हॉटेलमध्ये का आणली, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून सबंधित कार चालकाची कसून चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. एकंदरीत या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
काय म्हणाला ड्रायव्हर..?
गाडीचे हप्ते थकल्याने ड्रायव्हरने गाडीचा नंबर बदलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. या गाडी मालकाचे नाव प्रसाद कदम असे आहे. तो मुरुड जंजिऱ्याजवळ सिवूडचा आहे. प्रसाद कदमच्या गाडीचे ६ हप्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने गाडी जप्त केली होती. ही गाडी सोडवून घेतल्यानंतर पुन्हा जप्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने बनावट नंबर प्लेट लावल्याचे त्यांने सांगितले. जो नंबर या चालकाने लावला आहे त्या मूळ मालकाच्या नावावर एकदा ट्रॅफिक चलन कापले गेल्याचेही चौकशीत समोर आले आहे.












Click it and Unblock the Notifications